विधान परिषद परभवानंतर बंडखोरीचा सामना करणाऱ्या चंद्रकांतदादांचा राज ठाकरेंना राज्यभर फिरण्याचा सल्ला


विशेष प्रतिनिधी

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ल्यांमध्येच पराभव झाल्यानंतर पक्षांतर्गत बंडखोरीचा सामना करणाऱ्या चंद्रकांतदादा पाटलांनी राज ठाकरे यांना मनसे पक्षवाढीसाठी राज्यभर फिरण्याचा सल्ला दिला आहे.

चंद्रकांतदादांनी दोनदा प्रतिनिधित्व केलेली पुण्याची पदवीधर मतदारसंघाची जागा गमावल्यानंतर त्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातूनच त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सहापैकी फक्त एका जागेवर विजय मिळवला तर चार जागा त्यांना गमवाव्या लागल्या.

चंद्रकांतदादांनी चुकीचे उमेदवार दिल्याने पराभव झाल्याची खंत भाजपच्या निष्ठावंतांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली. आणि आता तेच चंद्रकांतदादा मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मनसेच्या वाढीसाठी राज्यभर फिरण्याचा सल्ला देत आहेत.

‘राज ठाकरे यांना पक्ष वाढवायचा असेल तर त्यांनी राज्यभर फिरायला हवं. आपण राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरलो तरच आपली ताकद किती आहे याचा अंदाज आपल्याला येतो’, असे चंद्रकांतदादांचे म्हणणे आहे.

राज्यातील ३४ जिल्ह्यांत १४ हजारांवर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा आणखी एक सामना रंगणार आहे. त्यातच मनसेने या निवडणुका पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्णय घेऊन तसे आदेशच राज ठाकरे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिले आहेत.

त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रातही आपला जनाधार वाढवण्याचा मनसेचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांतदादांनी राज ठाकरे यांना पक्ष वाढवायचा असेल तर राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरावे लागेल. फिरल्याने आणि प्रत्येक निवडणूक लढल्याने आपल्याला नेमका किती जनाधार आहे, जनतेचा किती प्रतिसाद आहे, याचा अंदाज येतो, असे सांगितले.

महापालिका निवडणुकांमध्ये मनसेचा किती प्रभाव असेल, हे सांगता येऊ शकते मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचा किती परिणाम होईल, हे सांगता येणार नाही, असे चंद्रकांतदादा म्हणाले.

भाजप – मनसे युतीबाबत विचारले असता मनसेशी आम्ही युती करणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. ग्रामपंचायत निवडणुका भाजप पूर्ण ताकदीने लढणार आहे. या निवडणुकीसंदर्भात भाजप आमदारांची बैठक झाली असून त्यांना काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत, असेही पाटील म्हणाले. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीचे निकष ग्रामपंचायत निवडणुकीला लावता येणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात