केरळातील मधूर पंचायतीचा गड भाजपने पुन्हा राखला

  • एनडीएने 20 पैकी 14 वॉर्ड जिंकले

वृत्तसंस्था

कासारगोड : केरळ राज्यातील कासारगोड जिल्ह्यातील मधुर पंचायतीच्या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ( एनडीएने) 20 पैकी 14 वॉर्ड जिंकले आहेत. गेल्या 40 वर्ष भाजप येथे 1980 पासून विजयी होत आहे.

कोचीत काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार  भाजप उमेदवाराकडून 1 मताने पराभूत

कोची महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसप्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे (युडिफचे) महापौरपदाचे उमेदवार एन वेणूगोपाल हे भाजपच्या उमेदवाराकडून अवघ्या 1 मताने पराभूत झाले आहेत. निवडणुकीतील भाजपचा हा विजय महत्वपूर्ण मानला जात आहे.

वेणूगोपाल हे उत्तर आयलंड वॉर्डचे प्रतिनिधीत्व करतात. केरळमध्ये 1200 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 सत्रात झाल्या होत्या. 21893 वॉर्डमध्ये मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरु झाली.


कोची महापालिकेत काँग्रेसप्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट 10 वर्षांपासून सत्तेवर आहे. महापौरपदाचा उमेदवार पडल्यामुळे फ्रँटला मोठा धक्का बसला आहे. खरे तर वेणूगोपाल हे दक्षिण आयलंड वर्डमधून दोनदा आणि उत्तर आणि दक्षिण वॉर्ड एकत्र असताना निवडून आले होते. यंदा मात्र 1 मताने पराभूत झाल्यावर सर्व खापर काँग्रेसच्या परंपरेप्रमाणे राजकारण आणि प्रामुख्याने मतदार यंत्रावर फोडले आहे.

एलडीएफची बाजी

केरळमध्ये सहा टप्प्यात स्थानिक संस्था मतदान घेण्यात आले. तिसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीत दक्षिणेकडील राज्यात 78 .78 टक्के मतदान झाले. सुरुवातीच्या ट्रेंडवरून निवडणुकीत एलडीएफ विजयी होऊ शकेल. एलडीएफ ग्रामपंचायती, ब्लॉक पंचायत, जिल्हा पंचायत आणि महामंडळांमध्ये आघाडीवर आहे.

दक्षिण केरळात भाजपची भगवी मूळं

यूडीएफ नगरपालिकेत एलडीएफपेक्षा काहीसे पुढे आहे. भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) दक्षिणेकडील केरळमध्येही प्रवेश केला आहे आणि 2015 च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत त्यांची संख्या सुधारली आहे. दक्षिणेकडील राज्यात भगवा युती कायमच मूळ धरत आहे. कोची कॉर्पोरेशनच्या उत्तर बेटावर विजय मिळवण्याबरोबरच तिरुअनंतपुरम कॉर्पोरेशनमधील भाजपच्या उमेदवारानेही एलडीएफचा प्रतिस्पर्धी एस. पुष्पलथा यांना 145 मतांच्या फरकाने पराभूत केले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*