प्रतिनिधी
शिर्डी : ज्येष्ठ नेते शरद पवार हे सद्य स्थितीत महाराष्ट्रातील सर्वांत मोठे नेते आहेत, पण त्यांचा आदर्श विचार घेऊनही राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात नंबर 1 चा पक्ष का झाला नाही?, याचे मंथन करण्याचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांनी महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिला. आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा भविष्यकाळ कसा असावा याची चर्चा केली पाहिजे, अशी अपेक्षा माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली. Why is Pawar the greatest leader but NCP is not the number 1 party
शरद पवार यांच्या प्रकृती बाबत आम्ही डॉक्टरांच्या संपर्कात होतो. त्यांच्या बाबत आता ऑल इज वेल असे म्हणावे लागेल, असे सांगून प्रफुल्ल पटेल पुढे म्हणाले की, २०१४ नंतर वेगळी राजकीय वातावरणाची निर्मिती झाली आहे. आपल्या विरोधी लोकांचे विचार चुकीचे असले तरी त्यांचा जनतेवर प्रभाव पडतो आहे. ते खोटे बोलत आहेत. लोकांची कामे करत नाहीत. मात्र लोकांच्या विचारांत बदल झाला आहे. हे आपल्याला समजून घेतले पाहिजे. काळाची पाऊले ओळखून चालले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर १० जून १९९९ला शिवाजी पार्कवर मोळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्याचे वातावरण उल्हासपूर्ण होते. १९९९ च्या निवडणुकीत विधानसभेच्या ५८ जागा मिळविल्या. त्यानंतर आपण खाली आलो. आपण सर्वांनी पक्षाचा उद्याचा काळ कसा असावा याची चर्चा केली पाहिजे.
– विजयाचे व्यस्त प्रमाण
यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक परफॉर्मन्सची परखड चिकित्सा केली. विदर्भाच्या ६० जागा आणि नगरसह पश्चिम महाराष्ट्रात १२० जागा या दोन परिसरातील आहेत. धुळे आणि नंदुरबार जोडला तर विधानसभेच्या १३० जागा होतात. या जागांमध्ये राष्ट्रवादीकडे मुंबई-ठाणे परिसरातील केवळ ४ जागा आहेत. विदर्भात ६ जागा आहेत. १३० पैकी केवळ १० जागा आहेत. उर्वरित १५८ जागांपैकी ४४ जागा आहेत. त्यामुळे या भागात भर दिला जावा. तसे केल्यास निश्चित पक्ष राज्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष होईल, असे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App