Raj thackeray : इतरांनी तुमचा पक्ष फोडला म्हणता, पण तुम्ही आयुष्यभर फोडाफोडी शिवाय काय केलं??; पवारांना राज ठाकरेंचा परखड सवाल!!

raj thackeray

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Raj thackeray शरद पवार म्हणतात, त्यांचा पक्ष फोडला. मग तुम्ही आयुष्यभर काय केलं?? 1978 मध्ये काँग्रेस फोडली. 1991 ला शिवसेना फोडली, त्यानंतर राणेंचं झालं. त्यांना फोडलं. तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी बोलता??, असा परखड सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे  ( Raj thackeray ) यांनी मुंबईतल्या मनसे पदाधिकारी मेळाव्यात केला. यावेळी त्यांनी अजितदादांनाही घेरले. त्यांना जेलमध्ये टाकण्याऐवजी भाजपने मंत्रिमंडळात टाकलं, असा टोला राज ठाकरे यांनी हाणला.Raj thackeray

अजित पवार आता ते गुलाबी जॅकेट घालून फिरतात. कोणी सांगितलं माहिती नाही. भाजप त्यांना स्वीकारतो तरी कसा?? अजित पवार भाजपमध्ये येण्याआधी मोदी म्हणाले होते, 70000 कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना जेलमध्ये टाकू. त्याऐवजी मंत्रिमंडळात टाकलं. हे का होतंय?? कारण तुम्हाला गृहीत धरलंय. सर्वांना गृहीत धरलंय, असे शरसंधान देखील र राज ठाकरे यांनी साधले.



राज ठाकरे म्हणाले :

मी आज लिहून देतो. लाडकी बहिण योजनेचे या महिन्याचे पैसे येतील. पुढच्या महिन्याचे येतील. नंतर पैसे येणार नाही. जानेवारी फेब्रुवारीत राज्याकडे पगार द्यायला पैसे नसतील. कोण मागतं तुम्हाला फुकट?? महिलांच्या हातांना काम द्या. कामातून त्या पैसे उभे करतील. त्यांना सक्षम बनवा. एवढ्या सक्षम महिला आहेतच. त्यांना मार्ग दाखवा. फुकट कसले पैसे देताय?? बेरोजगारांना फुकट पैसे. शेतकऱ्यांना फुकट वीज. शेतकरी कुठे मागतो फुकट वीज. तो म्हणतो वीजेत सातत्य द्या. कमी पैश्यात द्या. पण वीज तर द्या. राज्यात कोणी काही मागत नाही. यांना फुकट देण्याच्या सवयी लावायच्या आहेत. एकदा सवयी लागल्या तर इतर राजकीय पक्ष तेच करतील. नागडा होणार महाराष्ट्र. राज्य म्हणून काही विचार करणार की नाही.

समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा होता. विनायक मेटे यांनी मागणी केली होती. स्टॅच्यु ऑफ लिबर्टी पेक्षा दोन इंच उंच पुतळा हवा. कोण त्यांच्या डोक्यात घालतं माहीत नाही. मी तो पुतळा पाहिला. फ्रान्ससरकारने अमेरिकेला दिला होता. तो दगडी आयलँडवर आहे. आता एवढा उंच पुतळा झाला. मला शिल्पकला माहीत आहे. घोडा केवढा झाला? तुम्ही म्हणाल पटेलांचा पुतळा झाला. एका बाजूला चायनाला विरोध करायचा. चीनचे प्रोडक्ट घेऊ नका म्हणून सांगायचं आणि चीनमधून पटेलांचा पुतळा आणायचा.

समजा उद्या पुतळा बनवला. पहिल्यांदा समुद्रात जी भर घालावी लागेल ती किती घालावी लागेल. सिंधुदुर्गातील पुतळा वाऱ्याने पडला. तो काही फार मोठा नव्हता. म्हणजे शिल्पकला ही गोष्ट समजून घ्या. नुसता पुतळा उभा करायचा नसतो. उद्या समुद्रातील भराव खचला. पुतळा हलला. भराव टाकून पुतळा उभा करायचा असेल तर किमान 15 ते 20 हजार कोटी खर्च करावे लागेल. समुद्रात पुतळा उभा करण्यापेक्षा हे 15 ते 20 हजार कोटी गडकिल्ल्यांवर खर्च केले तर राजा कोण होता, त्याने काय बांधलं हे सांगता येईल!!

Sharad pawar broke Congress and shivsena earlier, targets raj thackeray

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात