रेल्वेतून प्रवास करत रेल्वेमंत्री अश्विनी वैैष्णव यांनी जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : नूतन रेल्वेमंत्री आणि माजी आयएएस अधिकारी अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेमध्ये प्रवास करत प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. या प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांशी गप्पा मारल्या आणि रेल्वे सेवांबद्दल नागरिकांचा प्रतिसाद जाणून घेतला. प्रवाशांना रेल्वे सेवांबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे प्रवास केला.Railway Minister Ashwini Vaishnav learned about the problems of passengers while traveling by train

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेल्वे आणि देशातील विकासाबद्दलच्या दृष्टिकोनाबद्दलही सांगितले. वैष्णव गुरुवारी भुवनेश्वर येथे जन आशीर्वाद यात्रा सुरू करण्यासाठी पोहोचले. यावेळी त्यांनी भुवनेश्वर ते रायगडा ट्रेनमध्ये प्रवास केला. त्यांना रेल्वेत प्रवास करताना बघून प्रवाशांना आश्चयार्चा धक्का बसला.



भुवनेश्वरहून रायगडाच्या दिशेने रात्रभर प्रवास करताना त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला आणि रेल्वेबद्दल प्रवाशांचं सामान्य मत काय आहे तसेच स्वच्छतेबद्दल त्यांचे फिडबॅक जाणून घेतले. प्रवाशांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्र्यांनी त्यांना ट्रेनमधील सुविधांबद्दल विचारले.

प्रवाशांना ट्रेनचा प्रवास आरामदायी होतो का, असेही विचारले. तसेच रेल्वेत स्वच्छ भारत अभियानच्या नियमांचे पालन केले जात आहे की नाही याबद्दलही त्यांनी विचारणा केली. तसेच रेल्वेतील तरुणांशी संवाद साधून त्यांचा नवीन भारताविषयीचा दृष्टिकोन जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

वैष्णव म्हणाले की ही एक पूर्णपणे वेगळी भावना आहे. तुम्ही एखाद्या मिशनवर असताना भारताची लाइफलाइन असलेल्या रेल्वेत प्रवास करणं हा अनूभव वेगळाच आहे. हा प्रवास आपल्याला जबाबदारीची जाणीव करून देतो. रेल्वेमंत्री म्हणून मी स्वत: हा फिडबॅक घेणं खूप महत्वाचं आहे.

तसेच गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वेतील सोई-सुविधा सुधारल्या आहेत, याचं प्रवाशांनी कौतुक केले आहे. रेल्वे आधीपेक्षा जास्त स्वच्छ असतात, त्यामुळे प्रवास करण्याचा आनंद द्विगुणीत होतो,अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्याचं वैष्णव म्हणाले.वैष्णव यांनी संवाद साधलेल्या एका महिलेनं म्हटलं की रेल्वेमंत्र्यांना भेटून मला खूप आनंद झाला. ते खूप चांगले आणि मनमिळावू व्यक्ती आहेत. ते तरुणांना प्रोत्साहन देतात.

Railway Minister Ashwini Vaishnav learned about the problems of passengers while traveling by train

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात