वृत्तसंस्था
नवी दिल्ली : नौदलात अधिकारी बनण्याची मोठी संधी पुरुष आणि महिला अभियंत्यांना आहे. कारण लवकरच शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसरची भरती करण्यात येणार आहे. Opportunity for engineers to become officers in the Navy; Short Service Commission Officer will be recruited
भारतीय नौदलात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड ऑफिसरच्या (SSC Officer) १८१ पदांसाठी जाहिरात दिली आहे. अभियांत्रिकी (Engineering) पदवी पूर्ण केलेले पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतील. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया १८ सप्टेंबर २०२१ पासून सुरू होईल. नौदलाच्या नियमांनुसार उमेदवारांची निवड होईल.
भरतीच्या महत्वाच्या तारखा
एकूण जागा : १८१ पदांसाठी संधी अर्ज : १८ सप्टेंबरपासून सुरू होईल शेवटची तारीख : ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर आहे. – अर्ज फी : सर्व उमेदवारांनी ५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज आणि फी जमा करावी. भरती परीक्षेची तारीख : निश्चित झालेली नाही
अर्ज करण्यासाठी पात्रता
तांत्रिक शाखेच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे ६० टक्के गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये बी टेक (B.Tech) किंवा त्याच्या समकक्ष अभियांत्रिकी पदवी आवश्यक आहे. शिक्षण शाखेच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी, ५५ % गुणांसह एमए पदवी पूर्ण केलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा आणि अर्ज फी
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २४ वर्षे दरम्यान असावे. उमेदवारांची जन्मतारीख २ जुलै १९९७ ते १ जानेवारी २००३ दरम्यान असावी. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. सर्व श्रेणींसाठी अर्ज विनामूल्य आहेत.
याप्रमाणे अर्ज करू शकता
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना भारतीय नौदलाच्या अधिकृत भरती वेबसाइट www.joinindiannavy.gov.in ला भेट द्यावी लागेल. तिथं त्यांना या भरतीची अधिसूचना मिळेल, डाऊनलोड केल्यानंतर ते नीट वाचा. यामध्ये तुम्हाला अर्जाच्या प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती मिळेल..
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App