विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला. त्यानंतर भारताने जम्मू काश्मीरमधल्या आपल्या हद्दीतल्या धरणांचे दरवाजे आपल्याला हवे तेव्हा बंद केले आणि हवे तेव्हा उघडले. त्यामुळे बागलीहार, सलाल या धरणांमधून पाकिस्तानला जाणार वाहून जाणारे पाणी अनियमित झाले. याचा फटका आता पाकिस्तानला बसला असून पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची मध्ये प्रचंड पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कराची सारख्या सगळ्यात मोठ्या शहराचा पाणीपुरवठा तब्बल 40 % पेक्षाही खाली आला आहे. पाकिस्तानातले आघाडीचे वृत्तपत्र the dawn ने ही बातमी आता दिली आहे.
त्यासाठी पाकिस्तानने उघडपणे त्यासाठी भारताकडे बोट दाखविले नसून कराची महापालिकेच्या पाणीपुरवठ्यातल्या तांत्रिक अडचणीवर बोट ठेवले आहे. पाणीपुरवठ्याच्या लाईनची वेळी दुरुस्ती केली नाही म्हणून पाणीटंचाईला सामोरे जावे लागले, असा ठपका सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी कराची महापालिकेवर ठेवलाय.
पण प्रत्यक्षात कराची शहराला पाणीपुरवठा करणारी सगळी धरणेच कोरडी ठणठणीत पडलीत. कारण भारतातून पाणीच सोडले गेलेले नाही. भारताने जे थोडेफार पाणी सोडले होते, ते वेगवेगळ्या कालव्यांमधून वाहून गेले. त्यामुळे कराचीला पाणीपुरवठा करणाऱ्या सगळ्यात मोठ्या हब धरणात पाणीच उरले नाही.
त्यामुळे कराची शहराच्या सर्व भागांमध्ये प्रचंड पाणीटंचाई निर्माण झाली. कराचीला दररोज 1200 मिलियन गॅलन पाण्याची गरज असते, पण प्रत्यक्षात कराचीला सध्या फक्त 400 मिलियन गॅलन पाणीपुरवठा होऊ शकतोय. त्यामुळे कराचीच्या उच्चभ्रू जिना टाऊन पासून ते शेरशाह पर्यंत अनेक वस्त्यांमध्ये गेल्या 12 दिवसांपासून पाणीपुरवठाच झालेला नाही. भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर या पाणीटंचाईच्या बातम्या पाकिस्तानी माध्यमांनी झाकून ठेवल्या होत्या, त्या आता उघड्यावर येऊ लागल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App