India UK Trade: भारताने ब्रिटनसोबतची व्यापार चर्चा रोखली नाही; ब्रिटिश माध्यमातील ‘ते’ वृत्त निराधार!

India UK Trade

मार्चमध्ये खलिस्तान समर्थक लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात घुसले होते.

विशेष प्रतिनिधी

लंडन : भारतीय उच्चायुक्तालयावर खलिस्तानी समर्थकांकडून झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने ब्रिटनसोबतची व्यापर चर्चा रोखली असल्याचे वृत्त ब्रिटिश वृत्तपत्र द टाईम्सने दिले होते. मात्र हे वृत्त भारताकडून फेटाळण्यात आले असून, या निराधार चर्चा असल्याचे सांगण्यात आले आहे. India not blocking trade talks with UK British media news is baseless

जोपर्यंत ब्रिटन सरकार भारतीय उच्चायुक्तालयावर हल्ला करणाऱ्या खलिस्तानवाद्यांवर टीका करणारे विधान जाहीरपणे जारी करत नाही तोपर्यंत चर्चा पुन्हा सुरू होणार नाही, अशी भारताने भूमिका घेतल्याचे वृत्त माध्यमांद्वारे समोर आले होते. मात्र, भारताने हे वृत्त निराधार ठरवून फेटाळून लावले आहे.

मार्चमध्ये खलिस्तान समर्थक भारतीय उच्चायुक्तालयात घुसले होते. त्यानंतर हे खलिस्तानवादी भारतीय दूतावासाच्या पहिल्या मजल्यावर पोहोचले आणि त्यांनी भारतीय राष्ट्रध्वज खाली उतरवून त्या जागी खलिस्तानचा झेंडा लावला होता. या घटनेमुळे भारत यूकेवर प्रचंड नाराज असून व्यापार चर्चा रोखल्याचा दावा केला गेला होता. मात्र, आता यूके सरकार लवकरच खलिस्तान चळवळीशी संबंधित समर्थकांवर मोठी कारवाई करण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

India not blocking trade talks with UK British media news is baseless

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात