विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईच्या चारकोप परिसरात राहणारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे पदाधिकारी ऋषी पांडे ऊर्फ गुरुजी याला महिलेच्या फसवणूक प्रकरणी बोरिवली पोलिसांनी अटक केली. राष्ट्रवादीचा पदाधिकारी असलेल्या ऋषी पांडेने गुरुजी बनून फसवणूक केली. तो पोलिसांसोबत ओळख आहे तुम्हाला मदत करतो असे सांगून अनेकांकडून लाखो रुपये उकळत होता. Fraud of women by Sharad Pawar’s NCP official member
या प्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आरोपीच्या मागावर असलेल्या पोलिसांना गुंगारा देत आरोपी ऋषी पांडे हा मथुरा, गुजरात सोमनाथ उज्जैन अशा विविध मंदिरात जाऊन देवदर्शन करून अयोध्येला जाण्याच्या तयारीत असतानाच बोरिवली पोलिसांनी गुजरात येथून अटक केली. आरोपी सध्या बोरिवली पोलिसांच्या ताब्यात असून त्याने कुणाकुणाची फसवणूक केली यासंदर्भात अधिक तपास सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरिवली परिसरात राहणाऱ्या एका महिलेने फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती, यानंतर या फेसबुक पोस्टवरून मोठा वादही निर्माण झाला होता. प्रकरण बोरिवली पोलीस ठाण्यात गेले. दरम्यानच्या काळात महिलेची ओळख गुरुजी उर्फ ऋषी पांडे सोबत झाली. ऋषी पांडेने माझी पोलिसांसोबत ओळख असून प्रकरण दडपून टाकण्यासाठी महिलेकडून पोलिसांच्या नावावर चेक द्वारे लाखो रुपये घेतले, मात्र या प्रकरणात कृषी पांडेंकडून महिलेला कोणतीही मदत झाली नाही.
याबाबत महिलेने ऋषी पांडेंकडे पैसे मागण्यासाठी तगादा लावला. पांडेंने महिलेचे फोन घेणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या ध्यानात येताच तिने ऋषी पांडे ऊर्फ गुरुजी विरोधात तक्रार दिली. बोरिवली पोलिसांनी आरोपी विरोधात कलम 420 अन्वये गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी एपीआय बापू घोडके आणि पीएसआय कल्याण पाटील यांच्या तपास आरोपीचा माग घेण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आरोपी ऋषी पांडे पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आपला मोबाईलनंबर बदलून उत्तर भारतात देव दर्शनासाठी फिरू लागला. आरोपीने मध्य प्रदेश उज्जैन गुजरात सोरटी सोमनाथ या ठिकाणच्या धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. अयोध्येला जाण्यापूर्वीच बोरवली पोलिसांनी त्याला सुरत येथून अटक केली.
बोरिवली पोलिसांनी आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीने अजून कुणाकुणाची फसवणूक केली आहे का? या संदर्भात पोलीस अधिकचा तपास करीत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App