परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी फाडला पाश्चिमात्य माध्यमांचा बुरखा; कसा तो वाचा!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र नीतीमध्ये केवळ सुधारणा केली असे नाही, तर आत्तापर्यंत गेल्या 75 वर्षात भारताने परराष्ट्र नीती मध्ये जी आक्रमकता दाखवली नव्हती, ती आक्रमकता वास्तववादी पद्धतीने दाखवली आहे. इतकेच नव्हे तर पाश्चिमात्य देशांनी भारताच्या निर्माण केलेल्या नॅरेटिव्हला देखील ते चपखल प्रस्तुतर देत आहेत. Foreign minister s. Jaishankar exposed western media over the issue of hindu nationalism

असे दोन प्रसंग नुकतेच घडले आहेत. त्यांनी लिहिलेल्या “द इंडिया वे” पुस्तकाच्या अनुवादाचे प्रकाशन पुण्यात झाले. त्यावेळी भारतीय परराष्ट्र धोरणातील कूटनीतीचा संबंध त्यांनी भारतीय महाकाव्य महाभारताशी जोडून दाखवला. त्याचबरोबर दिल्लीत परराष्ट्र नीती संदर्भातल्या काही प्रश्नांना त्यांनी भारतीय परिप्रेक्ष्यातून उत्तरे दिली. या दोन्ही प्रयत्नांमधून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाश्चिमात्यांनी धारण केलेला विशिष्ट निरपेक्षतेचा मुद्दा बुरखा अक्षरशः फाडून काढला.

– फक्त भारत सरकारचे वर्णन हिंदू नॅशनॅलिस्ट

पाश्चिमात्य वृत्तपत्रे भारतातील मोदी सरकारचे वर्णन करताना कायम हिंदू नॅशनॅलिस्ट गव्हर्मेंट असे करतात. पण ही वृत्तपत्रे युरोपीय किंवा अमेरिकेतील कुठल्याही सरकारचे वर्णन ख्रिश्चन नॅशनॅलिस्ट अशा शब्दांमध्ये करत नाहीत किंवा त्या सरकारांना कुठल्या धर्माचे लेबलही लावत नाहीत. इतकेच नाही, तर पाकिस्तान सारख्या दहशतवादी देशांना देखील ते इस्लामिक नॅशनॅलिस्ट असे संबोधत नाहीत. ते मुद्दामून भारतातल्या सरकारला मात्र हिंदू नॅशनॅलिस्ट गव्हर्मेंट असे म्हणत राहतात, याकडे जयशंकर यांनी आवर्जून लक्ष वेधले.

– भारतीय कुटनीतीत पाश्चात्य उदाहरणे नकोत

त्याच वेळी जयशंकर यांनी भारतीय कूटनीतीचे क्षेत्र पाश्चिमात्य उदाहरणांनी कसे ग्रासले आहे, याचीही उदाहरणे दिली. लोकशाही पासून हुकूमशाही राज्य व्यवस्थेपर्यंतच्या सर्व राजवटींसाठी पाश्चिमात्य लेखकांनी लिहिलेले ग्रंथच कूटनीतीच्या अभ्यासात असतात. मॅकीऐव्हली, मिल यांचे ग्रंथ किंवा ट्रॉजन हॉर्स वगैरे संकल्पनाच भारतीयांच्या कूटनीतीच्या अभ्यासकांवर लादल्या जातात. पण भारतात सर्वात मोठे कूटनीतिज्ञ दोन होते, श्रीकृष्ण आणि हनुमान. या दोघांचा अभ्यास आणि भारतीय महाकाव्यांचा अभ्यास कूटनीतीच्या परिप्रेक्ष्यात होऊ दिला जात नाही, हे जयशंकर यांनी सांगितले.

– कूटनीतज्ञ श्रीकृष्ण आणि हनुमान

श्रीकृष्ण आणि हनुमान यांनी आपापली टास्क कूटनीतीची विविध शस्त्रे वापरून यशस्वी करून दाखवली. अशी अनेक उदाहरणे महाभारतात अस्तित्वात आहेत फक्त त्यांचा विचार महाकाव्य अथवा पुराणकथा म्हणून झाला. त्या ऐवजी तो कूटनीतीचा अभ्यास म्हणून व्हायला पाहिजे, असा आग्रह जयशंकर यांनी धरला आहे. भारतीय परराष्ट्र नीती आणि कूटनीती याचा धोरणात्मक अभ्यास करताना भारतीय उदाहरणांनीच तो अधिक स्पष्ट ठळकपणे दाखवला पाहिजे, याविषयी जयशंकर यांनी ठाम भूमिका व्यक्त केली.

Foreign minister s. Jaishankar exposed western media over the issue of hindu nationalism

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात