नाशिक : पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये ठाकरे आणि काँग्रेसच्या निर्णय असा झाला, की आधी पवार काका – पुतण्यांच्या पक्षांच्या यशात पाचर मारायची, नंतर भाजपशी लढत द्यायची!!. Congress UBT shivsena
कारण पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरांच्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये पवार काका – पुतण्यांच्या दोन्ही राष्ट्रवादींनी महाविकास आघाडीतल्या उद्धव ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस यांना दगा दिला त्यांना वाटाघाटींमध्ये अडकवून ठेवले आणि प्रत्यक्षात पवार काका – पुतण्यांनी एकमेकांशी जुळवून घेतले. त्यामुळे पहिला धडा पवार काका – पुतण्यांना शिकवायचा आणि नंतर भाजपची लढत द्यायची, असा निर्णय उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांनी घेतला.
– पवारांच्या राष्ट्रवादीकडून दगा
पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांनी आपली स्वतंत्र आघाडी जाहीर केली. या आघाडीमध्ये काही जागा मिळवायचा प्रयत्न शरद पवारांच्या राष्ट्रवादीने करून पाहिला. त्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चर्चा केली. त्यांना चर्चेत गुंतवून ठेवले. स्वतंत्रपणे आघाडी करायचा निर्णय घोषित करू दिला नाही. पण अखेरीस पवार काका आणि पुतण्या यांच्या दोन्ही पक्षांनी एकत्र यायचा निर्णय घेतला. त्यातून काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांना दगा दिला. पिंपरी चिंचवडचे माजी उपमहापौर आणि माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी हा संताप व्यक्त केला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोपच चाबुकस्वार यांनी केला.
– पंधरा दिवसांसाठी घटस्फोट
गौतम चाबुकस्वार यांच्या आरोपाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार सचिन अहिर यांनी पुण्यातून दुजोरा दिला. पवार काका – पुतण्याच्या दोन्ही राष्ट्रवादी खेळच करत होत्या. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर जायला तयारच नव्हती. अजित पवारांना महाविकास आघाडीशी युती करायची होती, तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडायला हवे होते. आम्ही भाजपबरोबर कधी जाणार नाही हे जाहीरपणे सांगायला हवे होते, पण त्यांनी ते सांगितले नाही. त्यामुळे आम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर जाणार नव्हतो आणि गेलोही नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमच्याशी संपर्क ठेवला, पण नंतर ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर निघून गेले. त्यामुळे आम्ही सुद्धा शरद पवारांच्या बरोबर जाणार नाही, असे सचिन अहिर यांनी पुण्यात जाहीर केले. पंधरा दिवसांसाठी सत्तेशी घटस्फोट घ्यायचा आणि पंधरा दिवसांनंतर पुन्हा भाजपच्या सत्तेच्या वळचणीला निघून जायचे, असला पवार काका – पुतण्यांचा प्रकार शिवसेना सहन करणार नाही, असा इशारा सचिन अहिर यांनी दिला.
– पवार काका – पुतण्यांच्या राष्ट्रवादींमध्ये मारणार पाचर
सचिन अहिर आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरांमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांची आघाडी जाहीर केली. ही आघाडी जाहीर करताना त्यांनी पवार काका – पुतण्यांच्या राष्ट्रवादींमध्ये पहिली पाचर मारायची आणि नंतर भाजपशी लढत द्यायची, ही स्ट्रॅटेजी ठरवली. पुणे महापालिकेच्या 165 जागांवर आघाडी जाहीर केली. उरलेल्या 65 जागांपैकी काही जागा दोन्ही राष्ट्रवादींमधून काँग्रेस किंवा शिवसेनेत आलेल्या नेत्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी रिकाम्या ठेवल्या. कारण पवार काका – पुतणे एक झाल्यामुळे ज्यांची तिकिटे परस्पर कापली जात आहेत, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी आणि काँग्रेसशी संपर्क ठेवलाय. एकदा का त्यांची तिकिटे पवार – काका पुतण्यांनी कापली, की तेच उमेदवार उद्धव ठाकरे यांची शिवसेना किंवा काँग्रेसमध्ये दाखल होणार आणि दोन्ही पक्षाच्या यांना तिकीट देणार असल्याचे सचिन अहिर आणि सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App