पटणा : Bihar Election : बिहारमध्ये यंदा विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीसाठी भाजपा, आरजेडी, काँग्रेस, जनता दल यांच्यासह स्थानिक पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपाला पुन्हा सत्तेत येऊ न देण्याचा निर्धार काँग्रेस आणि आरजेडीने केला असून, दोन्ही पक्षांनी प्रचाराला वेग दिला आहे. राहुल गांधी यांच्या ‘वोट चोरी विरोधी यात्रे’ला बिहारमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे, तर तेजस्वी यादव यांच्या सभांनाही प्रचंड गर्दी होत आहे. मात्र, केरळ काँग्रेसच्या एका पोस्टमुळे बिहारमध्ये काँग्रेस आणि इंडिया आघाडी बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे.
काय आहे प्रकरण
केंद्र सरकारने नुकतेच विविध वस्तूंवरील जीएसटी कमी केला, यामध्ये बिडीचाही समावेश आहे. याच मुद्द्यावरून केरळ काँग्रेसने एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्यांनी लिहिले, “बी वरून बिडी आणि बी वरून बिहार.” ही पोस्ट वादाची ठिणगी ठरली. भाजपाने याचा फायदा घेत काँग्रेसवर बिहारी अस्मितेचा अपमान केल्याचा आरोप लावला. यामुळे काँग्रेसच्या विरोधात वातावरण तापू लागले आहे.
बिडीचा इतिहास
पोर्तुगीजांनी भारतात तंबाखूची शेती सुरू केली. युरोपियन लोक सिगारेट ओढत असत, जी भारतात उच्चभ्रू वर्गाची सवय मानली जायची. सिगारेट महाग असल्याने सर्वसामान्यांना ती परवडत नव्हती. यातूनच बिडीचा उदय झाला. 1930 पर्यंत भारताने तंबाखूच्या शेतीत जागतिक स्तरावर ओळख निर्माण केली. ब्रिटिश राजवटीत तंबाखू उद्योगाला चालना मिळाली. महात्मा गांधी यांच्या स्वदेशी चळवळीमुळे बिडी उद्योगाला बळ मिळाले. भारतात बिडी उत्पादन प्रामुख्याने बिहार, मध्य प्रदेश, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होते. सध्या भारतात बिडी उद्योगातून सुमारे 45 लाख लोकांना रोजगार मिळतो.
केरळ काँग्रेसच्या या पोस्टमुळे बिहारमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. काँग्रेसला या वादातून सावरण्यासाठी कसोटी पाहावी लागणार आहे. बिहारच्या निवडणुकीत हा मुद्दा कितपत प्रभाव टाकेल, हे येणारा काळच ठरवेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App