अथर्व सुदामेने सेक्युलारिझमचा संदेश देणारा फक्त एक व्हिडिओ डिलीट केला. त्याबरोबर सेक्युलर भारतावर हिंदुत्वाची ढगफुटी झाली. त्या ढगफुटीच्या पावसात सेक्युलर भारतातल्या लिबरल लोकांची घरे दारे, एनजीओची कार्यालये, त्यांची बँक खाती सगळे सगळे वाहून गेले. सेक्युलर भारतातले लिबरल लोक उघड्यावर आले. हा सगळा अनर्थ अथर्व सुदामे सेक्युलारिझमचा संदेश देणारा फक्त एक व्हिडिओ डिलीट केल्यामुळे घडला!!
सबब अथर्व सुदामे याने सेक्युलरिझमचा संदेश देणारे असे अनेक व्हिडिओ शूट करावेत. ते आपल्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड करावेत. जेणेकरून सेक्युलर भारतातल्या लोकांना पुन्हा निवारा मिळू शकेल. त्यांच्या एनजीओची कार्यालय पुन्हा उघडू शकतील. त्यांची बँक खाती पुन्हा सुरू होऊ शकतील. भारताच्या क्षितिजावर सेक्युलारिझमचा सूर्य पुन्हा उगवू शकेल. हे सगळे अथर्व सुदामे याने सेक्युलरिझमचा संदेश देणारे व्हिडिओ पुन्हा शूट करून अपलोड केल्याने घडून येईल.
सबब अथर्व सुदामे याने भारताच्या सेक्युलारिझमची लाज राखावी. त्याने हिंदू बिंदू फालतू लोकांच्या नादी लागू नये. त्या उलट “उच्चशिक्षित”, “उच्चभ्रू” सेक्युलर लोकांच्या सल्ल्याने (शक्यतो फुकटच्या) आपल्या सेक्युलर व्हिडिओचे दुकान youtube वर चालवावे. सेक्युलर लोक जसे एनजीओ चालवून कमाई करतात, त्या पद्धतीने कमाई करावी. म्हणजे भारतातला सेक्युलारिझम धन्य होईल. लिबरल लोक खुश होतील. त्यांची घरे दारे आणि दुकाने सुखनैव चालू राहतील. अथर्व सुदामेने त्यांचेच ऐकत राहावे… शुभेच्छा… बाकी काही नाही…!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App