गणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा ?, औरंगजेबाचा की अफजल खानाचा?


प्रतिनिधी

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात जे अद्भुत पराक्रम केले त्यामध्ये आदिलशाही सरदार अफजल खान वध फार महत्त्वाचा ठरला आहे. अफजल खान हा शिवाजी महाराज स्थापन करत असलेल्या स्वराज्याला नख लावायला आला होता. कायमचे संपायला आला होता. त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने यमसदनी पाठवले. Appearance of Ganesha Mandal: Who exactly is killed?

मात्र अफजलखान वधाच्या मुद्द्यावरून गेल्या काही वर्षांमध्ये काही इतिहासकार वेगळ्या पद्धतीची मांडणी करताना दिसतात. त्यातून मोठे सामाजिक वाद देखील उद्भवले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये अफजलखान वधाचे देखावे दाखवू नयेत, यासाठी काही सरकारांनी त्यावर बंधने देखील आणली होती. पण काही गणेश मंडळांनी त्यावर मात करून अफजलखान वधाचे देखावे दाखवायचे ते दाखवलेच आहेत.

पण मुद्दा त्या पलिकडचा आहे. या देखाव्यांचे वर्णन करताना ऐतिहासिक संदर्भ न तपासता बिनधास्त दडपून ऐतिहासिक असत्य लिहिले जात आहे. शिवाजी महाराजांनी वध अफजलखानाचा केला, पण पुण्यातील कोथरूड मधील संगम तरुण मंडळाने सादर केलेल्या अफजल खान वधाचे रिपोर्टिंग मात्र मराठी माध्यमांमध्ये “औरंगजेबाचा वध” असे आले आहे. या मुद्द्यावरून सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू असून अनेकांनी त्या रिपोर्टिंगची खिल्ली उडवली आहे. आधीच अफजल खान वध हा काही माध्यमे “डाऊन प्ले” करून प्रसिद्ध करत असतात. त्यात आता थेट अफजलखानाचे नावच वगळून त्या ऐवजी औरंगजेब वध असे त्या मराठी माध्यमाने छापल्याने अनेकांनी त्या बातमीच्या क्लिप आपापल्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केल्या आहेत आणि त्या करताना त्या रिपोर्टिंगचे वाभाडे देखील काढले आहेत.

Appearance of Ganesha Mandal: Who exactly is killed?

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात