विशेष प्रतिनिधी
पुणे : महायुती होवो न होवो, पुण्यात मात्र शिंदे सेना आणि पतित पावन संघटना यांनी युती केली. त्यामुळे भाजप आणि अजितदादांच्या संघर्षात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पतित पावन संघटनेची एक नवी ताकद मिळाली. मधल्या मध्ये एकनाथ शिंदे यांनी बेरजेचे राजकारण करून घेतले. Alliance of Shinde Sena
शिवसेना आणि पतित पावन संघटना यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यास काल उपस्थित राहून एकनाथ शिंदे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि पतित पावन संघटनेचा युतीची घोषणा केली. भगव्या एकतेचा हा क्षण ऐतिहासिक असल्याचे नमूद करत जो हिंदुत्व विसरला, तो स्वतः ला विसरला आणि जो स्वतःला विसरला, तो देश विसरला व जो देश विसरला, तो अस्तित्व विसरला अशी घणाघाती टीका याप्रसंगी केली.
पतित पावन संघटनेने हिंदू संस्कृती आणि सावरकरांचा विचार जिवंत ठेवला आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी उभी केली. आज हे दोन प्रवाह एकत्र आले म्हणजे भगवा रंग आणखी गडद झाला असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. हिंदुत्व विसरून जे लोक सत्ता मिळवण्यासाठी विचारधारेशी तडजोड करतात, पाकिस्तानचे झेंडे फडकवणाऱ्यांसोबत बसतात, ते आता हिंदुत्व शिकवायला निघाले आहेत. हेच दुर्दैव आहे. आमचं हिंदुत्व मात्र खुर्ची दिसली की बदलणारे नाही. सत्ता-खुर्ची ही मोह-माया आहे, पण भगवा हा श्रद्धा आहे! जो भगवा विसरतो, तो महाराष्ट्र विसरतो, असे शिंदे यांनी यावेळी निक्षून सांगितले.
याप्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, गृह राज्यमंत्री योगेश कदम, खासदार श्रीरंग बारणे, शहरप्रमुख नाना भानगिरे, नितीन गिरमे, प्रांताध्यक्ष सोपानराव देशमुख, प्रांत सरचिटणीस नितीन सोनटक्के, राजा पाटील, श्रीमंत शिळीमकर, गोकुळ शेलार उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App