नेपोटिझम म्हणत.. चित्रपटात सहभागी स्टार किड्स ला नेटकरांनी केलं ट्रोल.. Zoya Akhtar upcoming movie The Archies
विशेष प्रतिनिधी
पुणे : दिग्दर्शिका जोया अख्तर यांचा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणारा आगामी सिनेमा द अर्चिज सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे .. या चित्रपटाची घोषणा झाल्या पासून आणि या चित्रपटाची स्टारकास्ट जाहीर झाल्यापासून या सिनेमावर अनेक प्रकारे टीका केली जातीय. द आर्चीच नुकतंच पोस्टर लॉन्च करण्यात आलं .. आणि ट्रॉलर्सनी या चित्रपटाला चांगलंचं ट्रोल केलं..
नेपोटिझम, नेपो किड्स असं म्हणत पोस्टर्स वर कमेंट केल्या आहेत ..
बॉलिवूड सेलिब्रिटी चे स्टार किड्स.. आणि त्यांचं बॉलीवूड मध्ये होणारे पदार्पण हे कायमच टीकाकारांच्या रडारवर आहे . या आधी आलिया भट, जान्हवी कपूर, सारा अली खान या स्टार किड्स च्या पदार्पणाच्या वेळी देखील नेपोटीझमचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर चर्चिला गेला होता ..
View this post on Instagram A post shared by ᴋʜᴜsʜɪ ᴋᴀᴘᴏᴏʀ (@khushi05k)
A post shared by ᴋʜᴜsʜɪ ᴋᴀᴘᴏᴏʀ (@khushi05k)
या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खानची मुलगी,सुहाना खान.. जान्हवी कपूर ची बहिण खुशी कपूर, बिग बी अमिताभ बच्चन यांची नात अगस्त्य नंदा ही स्टार किड्स डेब्यू करणार आहेत..
आपल्या पहिल्यां वहिल्या सिनेमाचं द आर्चीजचं पोस्टर सुहाना खान, खुशी कपूर त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल वरून शेअर केले आहे..सिनेमातील कलाकारांविषयी बोलायचं झालं तर जरी हे स्टार किड्स असले तरी सिनेमातील ते सगळे फ्रेश चेहरे आहेत. कारण त्यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. सुहाना,खुशी,अगस्त्य व्यतिरिक्त मिहिर अहूजा,डॉट,वेदांग रैना आणि युवराज मेंडा हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रिलिज डेट समोर आली नसली तरी हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App