आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेचा रणसंग्राम सध्या सुरू असताना भारतीय चाहत्यांसाठी अत्यंत आनंदाचे वृत्त आहे.
भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज हिने नवा विश्वविक्रम रचला आहे. बीसीआयने मिताली राज हिला शुभेच्छा दिल्या.WOMENS WORLD CUP: Captain No. 1 batsman Mithali Raj! Kapil Dev leaves Dhoni behind … sets new world record …
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली:मितालीने विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक सामन्यात कर्णधार पद सांभाळण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. तिने विश्वचषक स्पर्धेत २४ सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. भारतीय महिला संघात सध्या कर्णधार मिताली राज आणि झूलन गोस्वामी या दोन अनुभवी खेळाडू आहेत. झूलन गोस्वामीने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता.WOMENS WORLD CUP: Captain No. 1 batsman Mithali Raj! Kapil Dev leaves Dhoni behind … sets new world record …
भारताची अनुभवी कर्णधार मिताली राजने सामन्यासाठी मैदानात पाय टाकाताच मोठ्या विक्रमाची नोंद केली. आयसीसी महिला विश्वचषकात सर्वात जास्त सामन्यांमध्ये स्वतःच्या संघाचे नेतृत्व करण्याचा मान मितालीने मिळवला आहे.
मिताली राजच्या नावावर अनेक विक्रम आहेत. पदार्पणाच्या सामन्यात शतक, सर्वात कमी वयात शतक, सर्वाधिक धावा असे अनेक विक्रम तिच्या नावे आहेत. मिताली हिने सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडीत काढत सर्वाधिक क्रिकेट खेळणारी क्रिकेटपटू ठरली आहे. मिताली ही वनडे मध्ये ६ हजार धावांचा पल्ला ओलांडणारी पहिली महिला ठरली आहे, असे अनेक विक्रम मिताली हिच्या नावावर आहेत.
मिताली राजसाठी (Mithali Raj) वेस्ट इंडीजविरुद्धचा हा सामना कर्णधाराच्या रूपातील महिला विश्वचकात (ICC Women’s World Cup 2022) खेळलेला २४ वा सामना होता. आता ती महिला विश्वचषकात सर्वाधिक सामन्यांमध्ये नेतृत्व करणारी कर्णधार बनली आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाची माजी महिला कर्णधार बेलिंडा क्लार्कच्या नावावर हा विक्रम होता, जिने २३ विश्वचषक सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले होते.
महिला विश्वचषाकात कर्णधाराच्या रूपात सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडू २४ सामने – मिताली राज (भारत) २३ सामने – बेलिंडा क्लार्क (ऑस्ट्रेलिया) १९ सामने – सुसान गोटमॅन (इंग्लंड)
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करणारे खेळाडू २४ सामने – मिताली राज २३ सामने – मोहम्मद अजहरुद्दीन १७ सामने – एमएस धोनी १५ सामने – कपिल देव
दरम्यान, महिला विश्वचषक २०२२ च्या पहिल्या दोन सामन्यांपैकी भारतीय संघाने एक जिंकला आहे, तर एकामध्ये पराभव पत्करला आहे. पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केले, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर मात केली. वेस्ट इंडीजविरुद्धचे यापूर्वीच प्रदर्शन पाहता भारताचे पारडे जड आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App