प्रतिनिधी
नागपूर : नागपूरमधील एका 24 वर्षांच्या महिलेला मध्यप्रदेशात नेऊन विकण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेने आईला फोन करून सांगितल्यावर पोलिसांनी शोध घेऊन तीची सुटका केली. Woman from Nagpur sold in Madhy Pradesh
पतीच्या मृत्यूनंतर निराधार झालेल्या महिलेला दोन महिलांसह तिघांनी फूस लावून पळवून नेले. तिची मध्यप्रदेशात एका व्यक्तीला पावणे दोन लाखात विक्री केली. यपीडित महिला २४ वर्षांची आहे तिला चार वर्षाचा मुलगा असून ती अजनीत राहते. तिच्या पतीचे निधन झाल्यामुळे ती निराधार झाली होती. स्वतः आणि मुलाचे भरण-पोषण करण्यासाठी ती मिळेल ते काम करत होती. कधी केटरर्सच्या कामालाही जायची.
आरोपी कुणाल अरुण ढेपे (वय ३७, रा. गणेश नगर कोतवाली), विभा मनोज वर्धेकर (वय ४०, रा महाकाली नगर) आणि मुस्कान मोहब्बुदिन शेख (वय ३१, न्यू फुटाळा वस्ती) यांच्याशी तिची ओळख होती. त्यांच्यासोबत एक दोनदा ती बाहेरही गेली होती. ती अधूनमधून आईकडेसुद्धा यायची. १९ एप्रिलला ती तिच्या बेलतरोडीतील आईच्या घरी आली होती. रात्री परत जाताना आरोपी कुणाल ढेपे, विभा वर्धेकर आणि मुस्कान शेख या तिघांनी तिला फूस लावून मध्यप्रदेशातील उज्जैन जवळच्या खाबतखेडा येथे नेले. तेथील भरत रघुनाथ सोलंकी (वय २४) त्याच्याकडून एक लाख ७० हजार रुपये घेऊन आरोपींनी पीडित महिलेला त्याच्या हवाली केले.
आरोपी सोलंकीने तिला विकत घेतल्यानंतर तो तिचा पत्नी सारखा उपभोग घेऊ लागला. तिचा मोबाइलही हिसकावून घेतला होता. तिच्यावर सतत पाळत ठेवायचा. संधी मिळताच पीडित महिलेने तिच्या आईच्या मोबाईलवर फोन करून सांगितले. पोलिसांनी मोबाइल फोन लोकेशन काढून तपास केला आणि या महिलेची सुटका केली.
महिलेची विक्री करणाऱ्या आरोपी कुणाल ढेपे, विभा वर्धेकर आणि मुस्कान शेख या तिघांना अटक करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App