विशेष प्रतिनिधी
मुंबई : सध्या किराणामालाच्या दुकानांमध्ये बीयर विकण्याची परवानगी सरकारने दिलेली आहेच. याच पार्श्वभूमीवर आता वाइनची विक्री देखील किराणा दुकाने आणि बेकरीमध्ये होणार का अशी चर्चा सुरू आहे.Wine now available in grocery stores and bakeries?
किराणा मालाची दुकाने आणि बेकरी मध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याचा विचार राज्य सरकारकडून केला जात आहे. वाइन ही अनेक बेकरी उत्पादनांमध्ये वापरली जाते. त्याचप्रमाणे कॉस्मॅटिक्समध्ये देखील ती वापरली जाते. वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे दैनंदिन किराणा साहित्य मिळणार्या दुकानात वाइनची विक्री करण्यास परवानगी देण्याचा विचार राज्य सरकारकडून केला जात आहे.
नागपुरात नियमांचे तिसऱ्यांदा उल्लंघन ; चक्क ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला
दुकानामध्ये जर वाइनची विक्री सुरू झाली तर 1 लिटर वाइनमागे 10 रूपये अबकारी कर लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीत 5 कोटींची कररुपी भर पडणार आहे. सध्या राज्यात दरवर्षी वाईनच्या एकूण 70 लाख बॉटल्सची विक्री होते. जर सरकारचे हे नवे धोरण लागू झाले तर हा आकडा 1 कोटींवर पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अशी बातमी एबीपी माझाने दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App