सर्व पक्षी व प्राणी निसर्गचक्रानुसार जीवन जगतात. सायंकाळी सूर्य मावळतीला गेला की ते झोपतात. पहाटे सुर्योदयाआधी उठतात. त्यामुळे त्यांचे सारे जीवन निसर्गनियमानुसार सुरु असते. पण काही वेळा अगदी भल्या पहाटे म्हणजे तीनच्या सुमारासाही काही पक्षी ओरडल्याचे ऐकायला यते. त्यामागील काही शास्त्रीय कारणे पक्षीतज्ञांनी शोधून काढली आहेत. सारेच पक्षी रात्री किंवा पहाटे ओरडत नाहीत. प्रामुख्याने पहाटे छोटा पिंगळा हा पक्षी गोंधळ घालतो.Why does the Pingala bird make a lot of noise at night?
छोटा पिंगळा गावाच्या शेजारी राहतो. हा पक्षी निशाचर असून रात्र गडद झाल्यानंतर सक्रिय होतो. कीटक व छोटे प्राणी मारून खातो. रात्री ग्रामपंचायतीने लावलेल्या खांबावरील दिव्यांच्या प्रकाशाला भुलून करोडो कीटक गोळा होतात. हे कीटक खाऊन पिंगळा उपजीविका करतो. पहाटेपर्यंत या पक्ष्यांची भूक शमलेली असते. त्यामुळे मस्तीत येऊन सारे पक्षी गोंधळ घालू लागतात. या पक्ष्यांचा आवाज खूपच कर्कश असतो. फारच थोडे पक्षी निशाचर आहेत. ढोकरी, रातवा या पक्ष्यांची गणना निशाचर म्हणून केली जाते.
परंतु, हे पक्षी रात्री किंवा पहाटे गोंधळ घालत नाही. याउलट टिटवी हा पक्षी निशाचर नसूनही रात्री अनेकांची झोप उडवून देतो. अनेक शिकारी पक्ष्यांना दिवसभर भक्ष्य मिळत नाही. मग, हे पक्षी नाईलाजाने रात्री बाहेर पडतात. चिमण्या, साळुंकी, होले, सातबाया असे अनेक पक्षी समूहाने राहतात किंवा एकमेकांच्या आधारे रात्र काढतात. अशा पक्ष्यांवर भुकेने व्याकूळ होऊन बहिरी ससाणे किंवा कावळे चक्क गडद काळोखात हल्ला करतात.
त्यामुळे सर्व पक्षी एकाएकी कालवा करू लागतात. कावळे व बहिरी ससाणे अगदी मध्यरात्री चिमण्यांच्या राहुटीवर हल्ला करतात. विणीचा हंगाम जवळ आल्यावर कोकीळ पक्षीही पहाटेपासून कुहू कुहू करू लागतो. पूर्वेला तांबडं फुटल्यानंतर मोरही टाहो फोडायला सुरुवात करतात. पण, हे सर्व अनुभवण्यासाठी जंगलात किंवा जंगलालगतच्या एखाद्या गावात तुम्हाला काही दिवस राहावे लागेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App