अमित शहांचे बंगाल दौऱ्यात स्वामी विवेकानंद, रामकृष्ण, सिध्देश्वरी, महाकाली दर्शन
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : माँ दुर्गा आणि जय श्रीराम यांच्या नावाने देण्यात घोषणा बंगाली संस्कृतीचा भाग नाहीत, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांचे वक्तव्या नेमका कोणाचा राजकीय लाभ करून देणार आहे?, असा प्रश्न पडतो आहे.
who will be benifted from amartya sens statement on bengali culture?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दोन दिवसांचा पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहे. त्याची सुरवात शहांनी रामकृष्ण मिशनला भेट, माँ सिध्देश्वरी पूजनाने केली आहे. त्या मुहूर्तावर अमर्त्य सेन यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत देऊन माँ दुर्गा आणि जय श्रीराम यांच्यासंदर्भात काही वादग्रस्त विधाने करण्यातला नेमका काय मतलब काढायचा? हा प्रश्न विचारला जातोय.
माँ दुर्गा आणि जय श्रीरामच्या घोषणा दुसऱ्यांवर लादल्या जातात. दुसऱ्यांना मारायला बहाणे शोधण्यासाठी या घोषणा दिल्या जातात, असे अमर्त्य सेन यांचे म्हणणे आहे. त्याच वेळी दुसरीकडे अमित शहा विवेकानंदांना श्रध्दांजली वाहिली आहे. रामकृष्ण आश्रमाला भेट दिली आहे. ते माँ सिध्देश्वरीची पूजा करताहेत. महामाया मंदिरातही जाऊन पूजा करीत आहेत. स्वातंत्र्यसैनिक खुदीराम बोस यांना श्रध्दांजली वाहणार आहेत. हे जरी प्रतिकात्मक असले तरी नेमक्या त्याच दिवशी अमर्त्य सेन यांचे हिंदू समाजाच्या श्रध्दास्थानांविषयी प्रतिकूल मत व्यक्त करणारे वक्तव्य प्रसिध्द होणे यातून ते कोणता आणि कोणाला राजकीय संदेश देऊ इच्छितात?, या प्रश्नाची उत्तरे शोधणे आवश्यक आहे.
अमित शहांनी या दौऱ्यात धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांची गुंफण केली आहे. यात राजकीय कार्यक्रम म्हणजे रोड शो आणि जाहीर सभा सगळ्यात शेवटी आहेत. पण स्वामी विवेकानंद, रामकृष्ण मिशन, सिध्देश्वरी माता मंदिर, महाकाली मंदिर यांचे दर्शन आणि शेतकऱ्याच्या घरी जेवण हे कार्यक्रम आधी ठेवले आहेत. एकीकडे बंगाली संस्कृतीला आपलेसे करण्याचा हा राजकीय भाग मानला जातोय. त्याचवेळी निरीश्वरवादी अमर्त्य सेन माँ दुर्गा, श्रीराम या प्रतिकांवर बंगाली संस्कृतीच्या नावाखाली प्रश्नचिन्ह लावताना दिसत आहेत.
यातला राजकीय संदेश बंगाली जनता कसा घेते आणि त्याला कसा प्रतिसाद देते याची उत्तरे नजीकच्या भविष्यकाळात मिळण्याची शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App