Long Working Hours : उशिरापर्यंत काम करणाऱ्यांना जागतिक आरोग्य संघटनेने मोठा इशारा दिला आहे. कोरोना महामारीच्या काळात Long Working Hoursची सवय जिवावर बेतू शकते. WHOच्या मते दीर्घ काळ काम करत राहिल्याने दरवर्षी हजारोंचा मृत्यू होत आहे. याचा थेट परिणाम हृदयावर होऊन हृदयविकार व स्ट्रोकचे प्रमाण वाढले आहे. कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे अनेक जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे कामाचे निश्चित वेळापत्रक नसल्याने याचा परिणाम थेट आरोग्यावर होत आहे. WHO Report Says Long working hours increasing deaths from heart disease and stroke
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उशिरापर्यंत काम करणाऱ्यांना जागतिक आरोग्य संघटनेने मोठा इशारा दिला आहे. कोरोना महामारीच्या काळात Long Working Hoursची सवय जिवावर बेतू शकते. WHOच्या मते दीर्घ काळ काम करत राहिल्याने दरवर्षी हजारोंचा मृत्यू होत आहे. याचा थेट परिणाम हृदयावर होऊन हृदयविकार व स्ट्रोकचे प्रमाण वाढले आहे. कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे अनेक जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे कामाचे निश्चित वेळापत्रक नसल्याने याचा परिणाम थेट आरोग्यावर होत आहे.
कामाचे तास वाढल्याने (Long Working Hours) आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामांविषयी सांगताना WHOने म्हटले की, ही सवय आता बदलण्याची गरज आहे. कारण यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, 2016 मध्ये दीर्घ काळापर्यंत काम करत राहिल्याने 7,45,000 जणांना स्ट्रोक आणि हृदयासंबंधी आजाराने मृत्यू झाला होता.
WHOचे तांत्रिक अधिकारी फ्रैंक पेगा (Frank Pega) यांनी एका पत्रपरिषदेत म्हटले की, उशिरापर्यंत काम करणे घातक ठरू शकते आणि आकडेवारी याचे पुरावे देत आहे. ते म्हणाले की, 2000 ते 2016 म्हणजेच 16 वर्षांत हृदयासंबंधित आजाराने होणाऱ्या मृत्यूंत अंदाजे 42 टक्के वाढीची नोंद झाली होती. तर स्ट्रोकच्या बाबतीत 19 टक्के वाढ झाली. यावरून ही स्थिती चांगली नाही, हे स्पष्ट होते.
WHO आणि आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेद्वारे करण्यात आलेल्या या संयुक्त अध्ययनावरून कळते की, याचा परिणाम 72 टक्के पुरुषांवर होता. ते मध्यम वयोगट वा त्याहून अधिक वयाचे होते. संशोधनात हेही समजले की, दीर्घ कामाच्या तासांचा प्रभाव खूप वेळानंतर दिसतो. दीर्घ शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होत राहतो, जो काही वर्षांनी मोठे संकट बनून समोर येतो. अनेकदा यातच मृत्यू ओढवतो.
WHOच्या मते, दक्षिण पूर्व आशिया आणि पश्चिम प्रशांत क्षेत्रात राहणारे लोक यात चीन, जपान आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे- यांच्यावर सर्वात जास्त प्रभाव झाला. संशोधनात असेही म्हटले की, आठवड्यात 55 तास किंवा त्याहून अधिक काम केल्याने स्ट्रोकचा धोका 35% आणि हृदयासंबंधित आजारांचा धोका 17% हून अधिक होतो. तथापि, WHOने हे स्पष्ट केले नाही की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर किती तास काम करणे योग्य आहे. परंतु एवढे जरूर सांगितले की, उशिरापर्यंत काम करणे नुकसानीचे ठरू शकते.
फ्रैंक पेगा म्हणतात की, आमच्याकडे काही पुरावे आहेत, ज्यावरून लॉकडाऊनसारख्या निर्णयांमुळे कामाच्या तासांमध्ये जवळजवळ 10 टक्के वाढ झाली आहे. म्हणजेच याा थेट परिणाम कर्मचाऱ्याच्या आरोग्यावर होतो. ते पुढे म्हणाले की, कामाचे तास कमी ठेवणे नियोक्त्यांसाठी फायदेशीरच ठरेल, कारण यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्पादकता वाढलेली दिसली आहे. पेगा असेही म्हणाले की, आर्थिक संकटाच्या काळात उशिरापर्यंत काम करणे टाळले पाहिजे, हा एक स्मार्ट पर्याय आहे.
WHO Report Says Long working hours increasing deaths from heart disease and stroke
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App