Breaking GOOD NEWS : लहान मुलांनाही मिळणार ‘स्वदेशी’ लस ! सिरमच्या Covavax ला WHO कडून मंजूरी …

पुण्यातील जगातील सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीचे सीईओ आदर पूनावाला यांनी ट्विटरवर ही बातमी शेअर केली.

WHO gives approval to Novavax-Serum Institute’s Covavax Covid vaccine for emergency use


वृत्तसंस्था

पुणे : भारतात तयार झालेल्या कोवोवॅक्सच्या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी जागतिक आरोग्य संघटनेने मंजूरी दिली आहे. सीरम इस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी ही माहिती दिली आहे. कोवोवॅक्सिन ही भारतात तयार झालेली तिसरी स्वदेशी लस आहे ज्याला आत जागतिक आरोग्य संघटनेने मंजूरी दिली आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की कोवाव्हॅक्स सुरक्षा आणि गुणवत्ता या दोन्ही बाबतीत अत्यंत श्रेष्ठ आहे.

 

विशेष म्हणजे, कोवोवॅक्स ही भारतातील तिसरी लस आहे, ज्याला WHO ने मान्यता दिली आहे. कोविशील्ड आणि कोवॅक्सीनचा यशस्वीपणे वापर केला जात आहे.

सर्व मानकांची पूर्तता झाली यापूर्वी डब्ल्यूएचओने कोवोव्हॅक्सच्या मंजुरीवर एक निवेदन जारी केले. त्यात म्हटले आहे की कोवोव्हॅक्सने WHO च्या सर्व प्रक्रियांचे पालन केले आहे. त्याची गुणवत्ता, सुरक्षा जोखीम व्यवस्थापन योजना इत्यादी पुनरावलोकन डेटामध्ये अचूक आढळले आहेत.

 

अदर पूनावाला यांनी पुढे असे म्हटले आहे की, पुण्यात या आठवड्यात तयार होणाऱ्या कोवोवॅक्सच्या पहिल्या बॅचचे साक्षीदार होण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. १८ वर्षांखालील मुलांचे संरक्षण करण्यासाठी या लसीमध्ये मोठी क्षमता आहे. संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन

सीरम इन्स्टिट्यूटने कोवोवॅक्सच्या निमिर्ती आणि पाठपुरवठ्यासाठी अमेरिका स्थित बायोटेक कंपनीच्या नोव्होवॅक्सशी करारा केलाय. SII ने कोवोवॅक्स लसीच्या १.१ मात्र तयार करण्यासाठी करार केला आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेच्या मंजूरीनंतर कोवोवॅक्स लसीचा पुरवठा देखील वाढवण्यात येईल.

 

WHO gives approval to Novavax-Serum Institute’s Covavax Covid vaccine for emergency use

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात