विशेष प्रतिनिधी
कोलकाता: पश्चिम बंगालमधील विजयानंतर तृणमूल कॉंग्रेसच्या सुप्रीमो आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गांधी परिवाराचा आदर्श घेत आपल्याच कुटुंबातील सदस्याला प्रमोट केले आहे . त्यांनी भाचा अभिषेकला पदोन्नती दिली आहे. त्यांचे पक्षातील स्थान वाढविण्यात आले आहे. त्यांना तृणमूलचे सरचिटणीस करण्यात आले आहे, तर तृणमूल युवा कॉंग्रेसची जबाबदारी अभिषेक यांच्या जागी सायोनी घोष यांना देण्यात आली आहे. पक्ष प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात शनिवारी झालेल्या पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. West Bengal: Mamata’s nephew gifted after victory in Bengal; Abhishek Banerjee promoted; New responsibilities in the party
TMC leader and actor Saayoni Ghosh appointed as the president of Trinamool Youth Congress. Abhishek Banerjee appointed as the party's general secretary during a meeting being held by party chief and CM Mamata Banerjee. — ANI (@ANI) June 5, 2021
TMC leader and actor Saayoni Ghosh appointed as the president of Trinamool Youth Congress. Abhishek Banerjee appointed as the party's general secretary during a meeting being held by party chief and CM Mamata Banerjee.
— ANI (@ANI) June 5, 2021
तृणमूलचे नेते कुणाल घोष यांना पक्षाच्या प्रदेश युनिटचे सरचिटणीस करण्यात आले आहे. पक्षाच्या निर्णयांविषयी माहिती देताना ज्येष्ठ नेते पार्थ चटर्जी म्हणाले की, कार्यकारी समितीने निर्णय घेतला आहे की पक्षात एका व्यक्तीचे एकच पद असेल. याला कोअर कमिटीने मान्यता दिली आहे.
अभिषेक हे ममतांच्या सर्वात विश्वासू लोकांपैकी एक आहेत आणि त्यांनी विधानसभा निवडणुकीत परिश्रम घेतले. तथापि, अभिषेक यांच्या पक्षात वाढलेल्या हस्तक्षेपामुळे अनेक जुन्या नेत्यांनी तृणमूलला राम राम ठोकला होता .
या बैठकीत पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचे रणनीतिकार असलेले प्रशांत किशोरही उपस्थित होते. बंगाल निवडणुकीत प्रशांत किशोर आणि अभिषेक बॅनर्जी यांनी एकत्र काम केले होते .
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App