हम होंगे कामयाब! एमईआयएल करणार लिक्विड ऑक्सिजनचा मोफत पुरवठा ; संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाची साथ ; बँकॉकहून मागवले ११ टँक

  • देशातील आघाडीची कंपनी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे केंद्र सरकारच्या सहाय्याने कोरोनाला लढा देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न.

  • मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (एमईआयएल) बँकॉक (थायलंड) येथून ,११ क्रायोजेनिक टँक आयात करीत आहे, ज्यामुळे रुग्णालयांना लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) पुरवठा वाढण्यास मदत होईल.

  • केंद्रीय संरक्षण व परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने बँकॉकमधून या टँकरच्या वाहतुकीस परवानगी दिली आहे.तसेच हे टँकर हैदराबादला आणण्यासाठी चंडीगड येथील संरक्षण दलाच्या विशेष विमानाने हे टँकर्स बँकॉकहून हैदराबादला आणले जात आहेत.

  • देशातील आघाडीची कंपनी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने ( Megha Engineering & Infrastructures Limited) रुग्णालयांमधील ऑक्सिजनची तुटवड्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे.We will succeed! MEIL will provide free supply of liquid oxygen; With the Ministry of Defense and the Ministry of Foreign Affairs; 11 tanks ordered from Bangkok

वृत्तसंस्था

हैदराबाद : मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (एमईआयएल) बँकॉक (थायलंड) येथून ११ क्रायोजेनिक टँक आयात करीत आहे, ज्यामुळे रुग्णालयांना लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) पुरवठा वाढण्यास मदत होईल. हे ऑक्सिजन एमईआयएलकडून तेलंगानाला विनामूल्य दिले जाणार आहे. देशातील आघाडीची कंपनी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने रुग्णालयांमधील ऑक्सिजनची तुटवड्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. यानुसार कंपनीने थेट वैद्यकीय वापरासाठीच्या लिक्विड ऑक्सिजनचा मोफत पुरवठा करण्यासाठी थायलंडमधून अद्ययावत ऑक्सिजन क्रायोजेनिक टँकर मागवले आहेत. यामुळे तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा अशा ३ राज्यांमधील रुग्णालयांना वेगाने ऑक्सिजन पुरवठा करणं शक्य होणार आहे.यासाठी केंद्र सरकार सर्वोत्परी मदत करत आहे.We will succeed! MEIL will provide free supply of liquid oxygen; With the Ministry of Defense and the Ministry of Foreign Affairs; 11 tanks ordered from Bangkok

देशातील ऑक्सिजनचा तुटवडा पाहता एमईआयएलने आपले इतर सर्व कामं थांबवत प्राधान्याने ऑक्सिजन प्रश्न सोडवण्यावर लक्ष केंद्रीत केलंय. त्यामुळे कंपनीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. MEIL importing 11 cryogenic tanks from Bangkok Thailand for transportation of medical liquid oxygen

 

एमईआयएलच्या (MEIL) या महत्त्वकांक्षी योजनेतील ११ ऑक्सिजन टँकरपैकी पहिल्या टप्प्यात ३ टँक हवाई दलाच्या बेगमपेट स्थानकावर (Begumpet Air Force Station) पोहचले आहेत. उर्वरित ८ऑक्सिजन टँकर पुढील काही दिवसात आणखी दोन टप्प्यात पोहचणार आहेत. आयात करण्यात येणाऱ्या प्रत्येक टँकरमध्ये जवळपास १ कोटी ४० लाख लिटर वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक करता येणार आहे. म्हणजेच एकूण ११ टँकर्समध्ये तब्बल १५ कोटी ४० लाख लिटर ऑक्सिजन रुग्णालयांना वेगाने पोहचवता येणार आहे.

एमआयईएलचे (MEIL) वरिष्ठ अधिकारी, तेलंगणाचे अर्थमंत्री टी. हरीश राव, तेलंगणाचे मुख्य सचिव सोमेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सल्लागार समिती या सर्व मोहिमेवर लक्ष ठेऊन आहे. विशेष म्हणजे ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेल्या या टँकरची आयात थायलंडमधील बँकॉकमधून करण्यासाठी देशाच्या संरक्षण मंत्रालयाने आणि परराष्ट्र मंत्रालयाने देखील परवानगी दिलीय. त्यामुळे संरक्षण दलाच्या विशेष विमानाने हे टँकर्स बँकॉकहून हैदराबादला आणले जात आहेत.

एमईआयएलचे उपाध्यक्ष पी. राजेश रेड्डी (P Rajesh Reddy, vice-president, MEIL) म्हणाले, “वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपनीपासून रुग्णालयांपर्यंत ऑक्सिजनची वाहतूक म्हणजे अनेक अडथळ्यांचं कोडं आहे. मात्र, आता या ११ क्रायोजेनिक टँकर्समुळे राज्य सरकारला तीव्र गरज असलेल्या रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात मदत होईल.”

 

“कंपनीची सर्व कामं थांबवत ऑक्सिजन पुरवठ्याला प्राधान्य”

विशेष म्हणजे एमईआयएलने कंपनीचे इतर सर्व कामं थांबवून ऑक्सिजन पुरवठ्याला प्राधान्य दिलंय. यासाठी त्यांच्याकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. एमईआयएलच्या बोलरूम येथील युनिटमधून ९ मे ते २१मे या काळात २९६९४ मेट्रिक टन (३ कोटी लिटर) वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशाला करण्यात आलाय. म्हणजे दररोज सरासरी ४०० ऑक्सिजन सिलेंडर येथून पुरवले जात आहेत.

We will succeed! MEIL will provide free supply of liquid oxygen; With the Ministry of Defense and the Ministry of Foreign Affairs; 11 tanks ordered from Bangkok

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात