सध्याच्या आधुनिक जगात उर्जेवरच सारे काही चालते. त्यामुळे उर्जा निर्मीती महत्वाची मानली जाते. जगात मोठे कारखाने, वाहने, यंत्रसामग्री इतकेच काय घरातही उर्जेची नितांत गरज असते. उर्जेशिवाय तुम्ही काहीच करु शकत नाही. त्यामुळे उर्जा निर्मीती ही सतत चालू राहणारी प्रक्रिया मानली जाते. त्यावर रोज नवे संशोधन सुरु असते. ऊर्जा त्याचप्रमाणे वीजनिर्मिती कशी करायची असा प्रश्न संशोधकांना कायम पडत असतो.Walk freely and make electricity
ऊर्जा निर्माण करणारी पेट्रोल, डिझेल, गॅस या साधनांची कमतरता भविष्यात जाणवणार आहे. मानवाची मागणी वाढत आहे. त्या तुलनेत उर्जा निर्माण करणे, ती साठवून ठेवणे हे मोठे आव्हान आहे. त्यासाठी सध्या अनेक देशांत सौरउर्जासारख्या अपारंपारिक स्त्रोतांचा देखील पुरेपूर वापर केला जात आहे. तरीही भविष्यात ऊर्जानिर्मितीचे वेगवेगेळे अभिनव मार्ग शोधण्याचे काम संशोधक सतत करीतच असतात. आता चक्क मानवी हालचालींचा वापर करून वीजनिर्मिती करण्याचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे.
या विजेचा वापर करून मोबाइल व अन्य यंत्रसामग्री चालवता येऊ शकेल असा त्यांचा दावा आहे. माणसाच्या रोजच्या दैनंदिन हालचालीतून वीजनिर्मिती करण्याचे संशोधन जगात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. चालण्यासाठी आपल्याला पैशाची गरज पडत नाही. यातून वीजनिर्मिती झाली तर. त्याच्यासारखा दुसरा आनंददायी मार्ग नाही. यातून हलक्या वजनाच्या उपकरणांची विजेची गरज यातून भागवली जाऊ शकते. गेल्या शतकात डायनामो तयार केले होते.
त्याच्या साहाय्याने वीजनिर्मिती केली जात होती. न्यूझीलंडच्या संशोधकांनी हे उपकरण बनविले आहे. एनर्जी हार्वेस्टर असे त्याचे नाव ठेवण्यात आलेले आहे. दिसायला साध्या दिसणाऱ्या या उपकरणातून उच्च शक्तीचे चुंबक, कॉइल यांच्या साहाय्याने उच्च शक्तीची वीजनिर्मिती केली जाऊ शकते. मात्र ही वीज विशेष सर्किटने खेचल्यानंतर ती रिचार्जेबल बॅटरीत साठवली जाते.
यासाठी विशेष कायनेटिक चार्जर्स या संशोधकांनी बनवले आहेत. या सर्व प्रयोगात विजेचा ट्रान्सफार्मर आणि क्षमतेची मुख्या अडचण होती. ती अडचणदेखील मायक्रोइलेक्ट्रॉनिक बॅटरी तयार करून सोडवली गेली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App