सकाळच्या उन्हात फिरण्याला आपण सूर्यस्नान म्हणू. सूर्यस्नानात तयार झालेले ड जीवनसत्त्वाचे कच्चे रेणू नंतर यकृतात जातात. तिथे त्यांचे रेणू थोडे पक्के होतात. त्यानंतर ते मूत्रपिंडाकडे नेले जातात. तिथे त्यांचे पक्के ड जीवनसत्त्व होते. त्यालाच डॉक्टरी भाषेत कोलेकॅल्सिफेरॉल म्हणतात. या प्रक्रियेला ४८ तास लागतात. ड जीवनसत्त्व मूत्रपिंडात तयार झालं की, त्याचं सर्वात महत्त्वाचं कार्य सुरू होते.Vitamin D is formed in the body in 48 hours
ते म्हणजे शरीरातून लघवीवाटे बाहेर पडणार्या कॅल्शिअमला पकडून परत शरीरात कार्यरत करणे. आपल्या शरीरात कॅल्शिअमची कमतरता निर्माण झाली तर शरीर हाडातून-दातातून हाडं पोखरून कॅल्शिअम काढून घेतं. पोखरलेली हाडं ठिसूळ बनतात. अशी हाडं मोडण्याची शक्यता वाढते. उन्हामुळे त्वचा काळवंडते म्हणून घराबाहेर पडल्यावर अनेक मुली-स्त्रिया चेहरा झाकून घेतात, हातपायही झाकून घेतात. त्यांच्यात ड जीवनसत्त्वाचा अभाव निर्माण होऊ शकतो.
त्वचा उजळ करण्याचे दावे करणारी क्रीम्स, सनस्क्रीनमधील रसायने त्वचेच्या आत ऊन जाऊ देत नाहीत. कितीही माइल्ड क्रीम असलं तरी ते अतिनील ब किरणांना त्वचेच्या आतल्या भागापर्यंत पोचू देत नाही. आपल्या शरीरात एक मिलिलिटर रक्तात ५० ते ७० नॅनोग्राम इतक्या प्रमाणात ड जीवनसत्त्व असावंच लागतं. इतकंसं ड जीवनसत्त्व आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ३००० जनुकांना कार्यरत ठेवतं.
ही जनुकं कार्यरत राहिली नाहीत तर शरीरात अनेक व्याधी आणि आजार निर्माण होऊ शकतात. ड जीवनसत्त्वाअभावी ऑस्टिओपोरोसीस म्हणजे हाडांमध्ये पोकळ्या वाढतात. पुढे मन दडपलेले असणे, मधूमेह, लठ्ठपणा, सोरायसीस, दुभंगलेली मनोवस्था, स्तनाचा, गर्भाशयाचा, प्रोस्टेटचा कर्करोग अशा अनेक विकारांची पायाभरणी होऊ शकते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App