लोकसहभागातून गावकऱ्यांनी अवघ्या दोन दिवसांत जमवले तब्बल १३ लाख रुपये
विशेष प्रतिनिधी
जयपूर: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा प्रसंग.. त्या प्रसंगात प्रत्येकाची भूमिका वेगळी आणि त्या त्या भूमिकेचं कर्तव्य ही वेगळं. कुठल्याही लग्न समारंभात वधु पित्याची भूमिका ही आणखी जबाबदारीचे असते. मात्र जयपुरमधील एका गावात संपूर्ण गावकऱ्यांनीच वधू पित्याचीं भूमिका पार पाडली. Villagers in Jaipur collected 13 lakh rupees from public participation and married the girls in a grand manner
१० मे रोजी जयपूरच्या बाडमेर या गावात एका घरामध्ये तीन सिलेंडर लिकेज होऊन मोठ्या प्रमाणावर आग लागली आणि आगीत घरातील सगळ्याच वस्तू भस्म झाल्या. ते घर होतं लग्न घर त्या घरातील दोन मुलींची १३ तारखेला लग्न होणार होती. मात्र दहा तारखेला झालेल्या या दुर्दैवी घटनेत घरातील किराण्यापासून वधू-वरांच्या पोशाखापर्यंतच्या सगळ्या वस्तू आगीमध्ये भस्म झाल्या. यामध्ये २५ हजारांपर्यंत दागदागिने आणि दहा लाख रुपये रोख रक्कम या सगळ्यांचा समावेश होता. या घटनेच्या धक्क्याममुळे त्या कुटुंबातील सात लोक बेशुद्ध झाले.
या सगळ्या परिस्थितीमुळे त्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. अवघ्या दोन दिवसावर आलेलं लग्न आणि घरावर आलेलं हे एवढं मोठं आगीच विघ्न या मोठ्या संकटातून बाहेर कसं पडावं या विचारात ते कुटुंब असतानाच. गावकऱ्यांनी मानवतेचा धर्मराखत केवळ ७२ तासात तब्बल १३ लाख रुपये लोकसहभागातून जमा केले आणि ठरलेल्या दिवशीच त्या दोन बहिणींचे लग्न धुमधडाक्यात लावून दिले. एवढंच नाहीतर वऱ्हाडी मंडळीला शिरापुरीचे जेवण देत. त्यांचा मानपान करत आनंदात त्या दोन लेकींची पाठवणी केली.
गावातील लोकांच्या या सहकार्यामुळे दुःखात बुडालेल्या त्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर काही काळासाठी का होईना मात्र हसू आलं. या सामाजिक कार्यात १००० कुटुंबाने सहभाग घेतला आणि हे शुभकार्य पार पाडलं. सध्याच्या या आत्मकेंद्रीय सामाजिक परिस्थितीत हे उदाहरण प्रचंड सकारात्मक वातावरण निर्माण करणार आहे. गावकरील ते राव काय करेल. असं उगाच म्हणत नाहीत. ते या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केलं.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App