माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनाही निवडणुकीत पराभव स्विकारावा लागल्यामुळे काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळलं गेलंय.
काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्येच अंतर्गत बंडाळी माजली आहे.एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत .आता ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री हरीश रावत देखील संशयाच्या भोवर्यात सापडले आहेत त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : माझ्यावर पक्षाचे पद आणि तिकीटे विकण्याचा आरोप केला जात आहे. हे आरोप अत्यंत गंभीर आहेत. पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री, सरचिटणीस आणि काँग्रेस कार्यकारीणीच्या सदस्यावर म्हणजेच माझ्यावर हे गंभीर आरोप केले आहेत.हरिश रावतांनी तिकीटं विकल्याचा आरोप काही नेत्यांनी केला आहे.या आरोपांमुळे हताश झालेल्या रावतांनी पक्षाने माझा राजीनामा घ्यावा आणि होळीत माझं दहन करावं अशी प्रतिक्रिया दिली आहे.UTTARAKHAND ELECTION: Defeat – Internal Rebellion in Congress! Burn me in Holi too – Harish Rawat’s desperate reaction after Congress allegations ….
#पद और पार्टी टिकट बेचने का आरोप अत्यधिक गंभीर है और यदि वह आरोप एक ऐसे व्यक्ति पर लगाया जा रहा हो, जो मुख्यमंत्री रहा है, जो पार्टी का प्रदेश अध्यक्ष रहा है, जो पार्टी का महासचिव रहा है और कांग्रेस कार्यसमिति का सदस्य है और आरोप लगाने वाला…1/2 pic.twitter.com/ixicDcSTyz — Harish Rawat (@harishrawatcmuk) March 15, 2022
#पद और पार्टी टिकट बेचने का आरोप अत्यधिक गंभीर है और यदि वह आरोप एक ऐसे व्यक्ति पर लगाया जा रहा हो, जो मुख्यमंत्री रहा है, जो पार्टी का प्रदेश अध्यक्ष रहा है, जो पार्टी का महासचिव रहा है और कांग्रेस कार्यसमिति का सदस्य है और आरोप लगाने वाला…1/2 pic.twitter.com/ixicDcSTyz
— Harish Rawat (@harishrawatcmuk) March 15, 2022
उत्तराखंडमधील काँग्रेस नेत्यांकडून होत असलेल्या आरोपांना हरिश रावत यांनी ट्विटरवरुन उत्तर दिलं आहे. ज्यात हरिश रावत म्हणतात….
हरिश रावत – उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्रीपद आणि पार्टी तिकीटं विकल्याचा आरोप माझ्यावर होतोय जो गंभीर आहे. जो माणूस याआधी मुख्यमंत्री राहिलेला आहे, जो पक्षाचा प्रदेशाध्यक्ष राहिलेला आहे, जो पार्टीचा महासचिव होता आणि काँग्रेस कार्यकारणिची सदस्यही होता अशा व्यक्तीवर हे आरोप करण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूला आरोप करणारा व्यक्ती महत्वाच्या पदावर असून त्याने केलेल्या आरोपांची जर इतर लोकं री ओढत असतील तर प्रकरण गंभीर होऊन जातं. मी देवाकडे प्रार्थना करतो की पक्षाने मला निलंबीत करावं, आपल्यातील वाईट शक्तींचं होळीत दहन करण्याची प्रथा आहे. त्यामुळे हरिश रावतच्या रुपाने वाईट शक्तीचं काँग्रेसने होळीत दहन करावं.UTTARAKHAND ELECTION: Defeat – Internal Rebellion in Congress! Burn me in Holi too – Harish Rawat’s desperate reaction after Congress allegations ….
या आरोपांखाली माझी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करावी, अशी देवाला प्रार्थना करतो. होळीच्या दिवशी वाईट विचारांचं दहन केलं जाते. त्याचप्रमाणे या हरिश रावत रुपी वाईट विचारांचं काँग्रेसने दहन करावं, असे हरीश रावत म्हणाले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App