विशेष प्रतिनिधी
लखनौ – अल कायदा या दहशतवादी संघटनेचा कट उत्तर प्रदेश पोलिसांनी आज उघडकीस आणला. पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केली. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लखनौसह उत्तर प्रदेशातील विविध शहरांमध्ये बाँबस्फोट घडवून आणण्याचा त्यांचा डाव होता. UP police held two peoples
पोलिसांनी सांगितले की, मिनाझ अहमद आणि मासिरुद्दीन अशी अटक केलेल्यांची नावे असून दोघेही लखनौचे रहिवासी आहेत. त्यांना काकोरी येथे अटक करण्यात आली. ते अल कायदाशी संबंधित असलेल्या अन्सर गझवत उल हिंद या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. पोलिसांचा छापा पडताच काही जण पळून गेले असून त्यांचा शोध सुरु आहे. कारवाईवेळी पोलिसांनी शस्त्रसाठा आणि स्फोटके जप्त केली.
अहमद आणि मासिरुद्दीन हे दोघे अल कायदाचा उत्तर प्रदेशातील म्होरक्या आणि या कटाचा सूत्रधार असलेल्या उमर हलमंडी याच्या सूचनेनुसार हे सर्व बाँबस्फोट घडवून आणणार होते. महत्त्वाची ठिकाणे आणि गर्दीच्या ठिकाणी बाँब पेरून ठेवण्याचे त्यांचे नियोजन होते. हल्ला करण्यासाठी मानवी बाँबचाही वापर केला जाणार होता. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये एका प्रेशर कुकर बाँबचाही समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App