मुलाच्या जन्माप्रित्यर्थ हवेत गोळीबार, उत्तर प्रदेशातील घटनेत पाच मुले जखमी

विशेष प्रतिनिधी

लखनौ – कुटुंबात मुलाचा जन्म झाल्याने आनंदाच्या भरात एका व्यक्तीने थेट हवेत गोळीबार केल्यामुळे पाच मुले जखमी झाली. उत्तर प्रदेशातील अश्रफपूर खेड्यात हा प्रकार घडला.
संबंधित व्यक्तीचे नाव नकुल यादव असे असून पोलिसांनी त्याला अटक केली. UP man fires in air, five children injured

त्याच्याकडून गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले. त्याने गोळीबार केला तेव्हा बाजूला मुले खेळत होती. ती पाच ते १२ वयोगटातील आहेत. यातील आठ वर्षांच्या अर्चना नामक मुलीची प्रकृती गंभीर आहे. तिला गोरखपूर रुग्णालयात हलविण्यात आले. इतरांना प्रथमोपचारानंतर घरी पाठविण्यात आले.

पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. गोळीबार करणाऱ्या नागरिकाला पोलीसानी अटक केली आहे. कदाचित त्याचा बंदुकीचा परवाना रद्द होण्याची शक्यता आहे.

UP man fires in air, five children injured

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात