भुजबळांविरोधात ओबीसी नेत्यांची एकजूट, विजय वडेट्टीवार यांचा पुढाकार


राज्यातील इतर मागासवर्गीय समाजाचे नेतृत्व आपणच करतो असे मानणाऱ्या छगन भुजबळ यांच्याविरोधात समाजातील नेत्यांची एकजूट झाली आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील इतर मागासवर्गीय समाजाचे नेतृत्व आपणच करतो असे मानणाऱ्या छगन भुजबळ यांच्याविरोधात समाजातील नेत्यांची एकजूट झाली आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Unity of OBC leaders against Bhujbal, initiative of Vijay Wadettiwar

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी यापुढे होणारे ओबीसी आंदोलन मोर्चे थांबणार असल्याची घोषणा औरंगाबादमध्ये केली होती. समीर भुजबळ यांच्या या घोषणेला इतर ओबीसी संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. ‘समता परिषद म्हणजे ओबीसी समाज नव्हे, शिवाय भुजबळांचे आंदोलन हे सरकार पुरस्कृत आंदोलन आहे,’ असा आरोपही इतर ओबीसी संघटनांनी केला आहे.

यापुढेही मोर्चे, आंदोलनं सुरूच राहणार असून 26 तारखेला नगरला ओबीसींचं जोरदार शक्ती प्रदर्शन होणार असून त्यामध्ये काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार सहभागी होणार आहेत. या आंदोलनाच्या मुद्द्यावरून व्हीजेएनटीचे बाळासाहेब सानप आणि ओबीसी संघर्ष सेनेचे प्रा. लक्ष्मण हाके यांनी समीर भुजबळांविरोधात शड्डू ठोकले आहेत.

Unity of OBC leaders against Bhujbal, initiative of Vijay Wadettiwar

औरंगाबादनंतर होणारे ओबीसी समाजाचे सर्व मोर्चे रद्द करण्यात येत आहेत. सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याचे आश्वासन दिल्याने मोर्चे रद्द करत आहोत, असे समीर भुजबळ यांनी म्हटले होते. मात्र, राज्यातील इतर ओबीसी नेते मात्र आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक आहेत.मराठा समाज आपल्या आरक्षणात वाटेकरी होईल, असे त्यांना वाटत आहे. या निमित्ताने विजय वडेट्टीवार ओबीसी समाजातील छगन भुजबळ यांचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ओबीसी नेत्यांना एकत्र करणे त्यांनी सुरू केले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील वादाची किनारही याला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस मराठ्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यामुळे ओबीसींना चुचकारण्याचा प्रयत्न कॉंग्रेसकडून केला जात आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात