वृत्तसंस्था
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला मुंबई एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. इक्बाल कासकरला मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं बुधवारी ताब्यात घेतलं आहे. ड्रग्ज प्रकरणात प्रोडक्शन वारंट वर त्याची कस्टडी घेतली. underworld don dawood ibrahim brother iqbal kaskar arrested by mumbai ncb
एनसीबीने चरसचे दोन कंसाइनमेंट पकडले होते. पंजाबचे लोक हे चरस काश्मीरवरुन मुंबईला मोटारसायलकलवरून आणायचे. जवळपास 25 किलो चरस पकडल होत. चौकशी एनसीबीला अंडरवर्ल्ड कनेक्शन मिळालं. यामुळंच दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला एनसीबीनं कस्टडीत घेतलं आहे. इक्बाल कासकर आधीपासूनच ठाण्याच्या कारागृहात आहे.
एनसीबीने मुंबईमध्ये काही ठिकाणी छापे टाकले. आरोपींची चौकशी केल्यानंतर आणि चरस सप्लायचं कनेक्शन इक्बाल कासकरशी असल्यानं एनसीबीनं कासकरला रिमांडमध्ये घेतलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App