कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत करणारे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात ट्विटरवॉर सुरू झाले आहे. विशेष म्हणजे दोघांनीही एकमेंकावर केंद्र सरकारशी सेटींग केल्याचा आरोप केला आहे. Twitter war between Amarinder Singh and Kejriwal
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कृषि कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असलेले पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात ट्विटरवॉर सुरू झाले आहे. विशेष म्हणजे दोघांनीही एकमेंकावर केंद्र सरकारशी सेटींग केल्याचा आरोप केला आहे. Twitter war between Amarinder Singh and Kejriwal
केजरीवाल यांनी एक दिवसाच्या उपवासाचे आवाहन केले आहे. यावर केजरीवाल यांचे हे नाटक असल्याचा आरोप अमरिंदरसिंग यांनी केला आहे. याला प्रत्युत्तर देताना केजरीवाल यांनी म्हटले की, ते शेतकऱ्यांचे सेवक असून शेतकऱ्यांच्या सोबत उभे आहेत. Twitter war between Amarinder Singh and Kejriwal
मात्र, अमरिंदरसिंग यांनी शेतकरी आंदोलनाचा सौदा केला असून आपल्या मुलाला ईडीच्या चौकशीतून वाचविण्यासाठी केंद्राशी सेटींग केले असल्याचा आरोप केला आहे.
यावर पुन्हा अमरिंदरसिंग यांनी उत्तर दिले असून केजरीवाल यांना भित्रट म्हटले आहे. शिरोमणी अकाली दलाच्या बिक्रम मजिठिया यांनी अब्रुनुकसानीचा दावा लावण्याची धमकी दिल्यावर केजरीवाल यांना पळता भुई थोडी झाली आणि त्यांनी माफी मागितली.
शेतकऱ्यांच्या हिताला जपण्यात केजरीवाल यांना पूर्ण अपयश आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापापासून त्यांना कोणीही वाचवू शकणार नाही. आगामी पंजाबच्या निवडणुकांत त्यांना यावर चांगलीच थप्पड मिळेल.
Twitter war between Amarinder Singh and Kejriwal
प्रत्येक पंजाब्याला माहित आहे की ईडी असो की कोणत्याही चौकशीपासून मी कधीही घाबरत नाही आणि त्यापासून पळतही नाही. मात्र, त्यांना हे माहित आहे की आपल्या फायद्यासाठी केजरीवाल आपला आत्माही विकण्यास कमी करणार नाही.
केजरीवाल तुम्ही दिल्लीमध्ये काळ्या कृषि कायद्यांना मान्यताच का दिली, तुमच्यावर केंद्राचा कोणता दबाव होता, असे प्रश्न अमरिंदरसिंग यांनी केला आहे. कोविडच्या उपाययोजनेत तुम्हाला पूर्ण अपयश आले. त्यामुळे केंद्राची मदत मागण्यासाठी रांगत जाण्यासाठी तुम्ही हे केले का? असा सवालही अमरिंदरसिंग यांनी केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App