Tokyo Olympics : चख दे !भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास : क्वॉर्टर फायनलमध्ये धडाक्यात दाखल


  • कॅप्टन राणी रामपालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाला टोकियो ऑलिम्पिकच्या बाद फेरीचं तिकीट मिळालं आहे.

  • अ गटाच्या अखेरच्या सामन्यात ग्रेट ब्रिटनने आयर्लंडला २-० ने हरवलं. आयर्लंडच्या संघाचा पराभव झाल्यानंतर भारतीय महिला संघाचं बाद फेरीतलं स्थान निश्चीत झालं. अ गटात भारतीय महिलांचा संघ चौथ्या स्थानावर राहिला.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघाने इतिहास घडवला . भारतीय महिलांनी पहिल्यांदाच हॉकीच्या क्वॉर्टर फायनलमध्ये जागा मिळवली आहे . कर्णधार रानी रामपालच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने ग्रुप स्टेजमध्ये 2 सामने जिंकले तर 3 सामन्यात पराभव पत्करावा लागला. आता महिला संघ क्वॉर्टर फायनलमध्ये धडाक्यात दाखल झााला आहे .Tokyo Olympics: Chak de ! Indian women’s hockey team makes history: enters quarterfinals

साखळी फेरीत पहिले ३ सामने गमावल्यानंतर भारताने आयर्लंडला १-० तर दक्षिण आफ्रिकेला ४-३ असं हरवलं. परंतू बाद फेरीत जाण्यासाठी भारतीय संघाला ब्रिटन विरुद्ध आयर्लंड सामन्याच्या निकालावर अवलंबून रहावं लागणार होतं.

वंदना कटारियाने केलेल्या गोलच्या हॅटट्रीकच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमधलं आपलं आव्हान कायम राखलं आहे.

Tokyo Olympics: Chak de! Indian women’s hockey team makes history: enters quarterfinals

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात