विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली:जगातील अव्वल क्रमाकांची महिला तिरंदाज असणाऱ्या दीपिका कुमारीने टोक्यो ओलिम्पिकमध्ये महिला पुरुष एकेरी स्पर्धेची चांगली सुरुवात करत पहिला सामना 6-0 च्या फरकाने जिंकला. तिने Trashiyangtse च्या करमा हिला नमवत हा विजय मिळवला.Tokyo Olympics: Archer Deepika Kumari’s victorious start; 6-0 victory
.@ImDeepikaK wins the 1/32 elimination round 6-0 to qualify for the next round. Stay tuned for more updates. #Archery #Olympics #Cheer4India pic.twitter.com/itWTDzmnlw — SAI Media (@Media_SAI) July 28, 2021
.@ImDeepikaK wins the 1/32 elimination round 6-0 to qualify for the next round. Stay tuned for more updates. #Archery #Olympics #Cheer4India pic.twitter.com/itWTDzmnlw
— SAI Media (@Media_SAI) July 28, 2021
आज झालेल्या लढतीत दिपीकाने अटीतटीच्या सामन्यात अमेरिकेच्या खेळाडूला 6_4 ने पराभूत करत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. दिपीकाचा उप-उपांत्यपूर्व फेरीचा सामना शुक्रवारी रंगणार आहे.
दिपीकाच्या तुलनेत अमेरिकेची खेळाडू जेनिफर फर्नांडीस ही वयाने लहान आहे. परंतू प्रत्यक्ष मैदानात जेनिफरने दिपीकाला चांगलंच झुंजवलं. दिपीकाचा सामना सुरु असताना मैदानात हवा होती, ज्यामुळे पहिल्याच प्रयत्नात तिला 7 गुणांवर समाधान मानावं लागलं. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नात दिपीकाने 9_9 गुणांची कमाई करत चांगलं पुनरागमन केलं. परंतू जेनिफरने पहिला सेट खिशात घालत आघाडी घेतली.
दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये दिपीका कुमारीने आपल्या अनुभवाचा फायदा घेत आश्वासक कमबॅक करत सामन्यांत आघाडी घेतली. 20 वर्षीय जेनिफरने या सेटमध्ये काही चुका करत दिपीकाला हातात संधी दिली. परंतू चौथ्या सेटमध्ये अमेरिकेच्या जेनिफरने पुन्हा एकदा सामन्याचं चित्र पालटलं.
अखेरच्या सेटमध्येही हा सामना चांगलाच रंगला. जेनिफकला दिपीकासोबत बरोबरी करण्यासाठी 10 गुणांची गरज असताना तिने शेवटच्या प्रयत्नात 9 गुण घेतले .
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App