प्रशासनाने डेटा ऑपरेटरना लसीकरणाशी संबंधित डेटा अपलोड करण्यासाठी ५०० रुपये मानधन दिले आहे.Three thousand Asha workers stopped vaccination work due to non-receipt of overdue amount
विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : थकीत रक्कम न मिळाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील तीन हजार आशा सेविकांनी लसीकरणाचे काम बंद केले आहे.याच कारण म्हणजे लसीकरणाशी संबंधित कामासाठी आशा सेविकांना दररोज दाेनशे रुपये देण्याचे आश्वासन आराेग्य विभागाने दिले हाेते. परंतु ते दोनशे रुपये आशा सेविकांनी मिळालेच नाही म्हणून आशा सेविकांनी लसीकरणाचे काम बंद आंदाेलन करत आहे.
आशा सेविका संघटनेच्या जिल्हाध्यक्ष नेत्रदीपा पाटील म्हणाल्या की , आम्ही जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना थकीत रक्कम मिळावी यासाठी पत्र लिहिले आहे.आरोग्य विभागाने आशा सेविकांना लसीकरण केलेल्या आणि लसीकरण न केलेल्या लोकसंख्येचे सर्वेक्षण आणि लसीकरण न केलेल्या नागरिकांचे समुपदेशन यासह अनेक कामांची जबाबदारी साेपविण्यात आली हाेती. ही जबाबदारी त्या समर्थपणे पेलत हाेत्या .
पुढे त्या म्हणाल्या की , प्रशासनाने डेटा ऑपरेटरना लसीकरणाशी संबंधित डेटा अपलोड करण्यासाठी ५०० रुपये मानधन दिले आहे. दरम्यान लसीकरणाशी संबंधित कामासाठी आशा सेविकांना त्यांची सेवा बजावण्यासाठी २०० रुपये देणे बंधनकारक आहे. तसेच जाेपर्यंत ही रक्कम मिळणार नाही ताेपर्यंत आम्ही काम बंद आंदाेलनाची भुमिका घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App