फसवून महिलेचे आणि तिच्या मुलांचे धर्मांतर करणाऱ्या ५ जणांविरोधात उत्तर प्रदेशातल्या रामपूरमध्ये गुन्हा, तिघांना अटक

वृत्तसंस्था

रामपूर – ट्रकचालकाच्या विधवा पत्नीला फसवून तिच्याशी विवाहाचे नाटक करून तिचे धर्मांतर करणाऱ्या तसेच तिच्या दोन लहान मुलांचे धर्मांतर करून खतना करणाऱ्या ५ जणांविरोधात उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी यूपी पोलीसांनी तिघांना अटक केली. हेच ते रामपूर आहे, जिथून आझम खान लोकसभेवर निवडून यायचे. Three arrested for forced convesion of woman and her two children in UP rampur

उत्तराखंडचा रहिवासी असलेला ट्रकचालक हरकेश होता. त्याचा ८ मे रोजी त्याचा रस्त्यावरील अपघातात मृत्यू झाला. महफूज हा देखील ट्रकचालक होता. हरकेशच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी हरजिंदर कौर आणि तिची दोन मुले राहुल – १२, सुमित – १० यांना घेऊन तो गावाला आला. ५ दिवसांपूर्वी त्याने तिचे नाव बदलून गुलिस्ता ठेवले आणि त्याने तिच्याशी विवाह केला. नंतर महफूजने तिला सांगितले, की तिच्या दोन्ही मुलांना जर घरात ठेवायचे असेल, तर त्यांचेही धर्मांतर केले पाहिजे. त्यानुसार मुस्लीम रीतीनुसार त्या दोन्ही मुलांची खतना केली.

पण त्यानंतर त्या दोन्ही मुलांची तब्येत बिघडली. गावातल्या हिंदू संघटनांनी पोलीस ठाण्यात केस दाखल केल्यावर पोलीसांनी हरजिंदर कौरला ताब्यात घेतले. मुलांना शहाबादच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. पण तोपर्यंत आरोपी फरार झाले होते. मात्र, नंतर पोलीसांनी त्यापैकी तिघांना पकडून अटक केली. या प्रकरणात फसवून धर्मांतर केल्या प्रकरणी तिघांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Three arrested for forced convesion of woman and her two children in UP rampur

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात