नौशाद शेख यांच्यासारखे काही तुरळक मुसलमान हिंदु धर्माविषयी किंवा हिंदूंच्या देवतांविषयी प्रचीती आल्यानंतर मंदिर बांधणे किंवा हिंदूंच्या देवतांची भक्ती करणे, यांसारखी कृती करतात.
देशात हिंदू-मुस्लिम ऐक्याची अनेक उदाहरणे आहेत, जिथे एकमेकांच्या धर्माचा आणि धार्मिक स्थळांचा आदर दाखवणारी अनेक कामे झाली आहेत.
विशेष प्रतिनिधी
रांची (झारखंड) – झारखंडमधील दुमका येथील हामीदपूर येथे रहाणारे नौशाद शेख हे ४० लाख रुपये खर्च करून भगवान श्रीकृष्णाचे मंदिर बांधत आहेत. ‘पार्थसारथी मंदिर’ या नावाने हे मंदिर उभारले जाणार आहे. वर्ष २०१९ पासून याचे बांधकाम चालू आहे.This is India: Naushad Sheikh from Jharkhand has been building a temple of Lord Krishna for the last 3 years at a cost of Rs. 40 lakhs!
#Jharkhand के #Dumka में #Muslim शख्स ने बनवाया मंदिर सब्सक्राइब करें #TimesNowNavbharat 👉:https://t.co/ogFsKfs8b9#TimesNowNavbharatOriginals #Temple #LordKrishnaTemple #MuslimBuildTemple pic.twitter.com/MDe0LvQ2xX — Times Now Navbharat (@TNNavbharat) February 13, 2022
#Jharkhand के #Dumka में #Muslim शख्स ने बनवाया मंदिर
सब्सक्राइब करें #TimesNowNavbharat 👉:https://t.co/ogFsKfs8b9#TimesNowNavbharatOriginals #Temple #LordKrishnaTemple #MuslimBuildTemple pic.twitter.com/MDe0LvQ2xX
— Times Now Navbharat (@TNNavbharat) February 13, 2022
१. नौशाद शेख यांनी सांगितले, ‘एकदा मी बंगालमधील मायापूरला फिरायला गेलो होतो. त्या वेळी माझ्या स्वप्नात भगवान श्रीकृष्ण आले. भगवान श्रीकृष्णाने मला सांगितले, ‘मी स्वतः तुझ्या परिसरात बसलो आहे. मग तू मला भेटायला येथे का आलास ? तू तेथेच जा.’ यानंतर मी पार्थसारथी मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला.
२. नौशाद शेख म्हणाले की, इस्लाममध्ये गरजूंची सेवा करण्यास सांगितले आहे, तसेच ‘प्रत्येक धर्माचा आदर करा’, असेही म्हटले आहे. या मंदिरात १४ फेब्रुवारीला अभिषेक होणार आहे. या वेळी पिवळ्या वस्त्रांतील १०८ महिला ‘कलश यात्रा’ काढणार असून ५१ पुजारी संपूर्ण वैदिक मंत्रोच्चारांत हा विधी करणार आहेत. मंदिराच्या आवारातच हवन करता येणार आहे. याखेरीज मंदिराच्या आवारात कीर्तन शेड, स्वयंपाकघर आणि पूजा करणार्या पुजार्यांसाठी स्वतंत्र खोली बनवण्यात येणार आहे.
३. हेतमपूर संस्थानामधील पुती महाराज यांनी ३०० वर्षांपूर्वी पार्थसारथीच्या पूजेला प्रारंभ केला होता. तेव्हा या ठिकाणी हेतमपूर संस्थानाचा दरबार असायचा. त्या काळात ते ‘जंगल महाल’ म्हणून ओळखले जात होते; मात्र संस्थान संपुष्टात आल्यानंतर येथील पूजेचे काम बंद पडले.
नौशाद शेख सारख्या माणसांची समाजाला आज नितांत गरज आहे : रोज काही स्वार्थी लोक जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडली जात आहे. अशा परिस्थितीत नौशाद शेख यांनी हिंदू मंदिर उभारणे हे स्वागतार्ह पाऊल म्हणता येईल. त्यांनी जातीय सलोख्याचे जे उदाहरण मांडले आहे तितके कौतुक करावे तितके कमी आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App