विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : रशिया युक्रेनमधील युद्धादरम्यान अॅपलने रशियामध्ये आपल्या उत्पादनांची विक्री पुर्णपणे थांबवली आहे. कंपनीने ही माहिती टि्वट करत दिली आहे. यापूर्वी कंपनीने रशियामध्ये अॅपलच्या सेवेवरती बंदी घातली होती.तसेच अॅपलने रशियाचे न्यूज अॅप्स आरटी आणि स्पुतनिक अॅप स्टोअरमधून काढून टाकले. They kill our children, now kill their access! Apples services have been banned in Russia
कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, Apple ने रशियामधील (Russia) सर्व विक्री चॅनेलवरील निर्यात थांबवली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की ते परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत आणि प्रभावित देशांच्या सरकारशी चर्चा करत आहेत.
No more @Apple product sales in Russia! Now @tim_cook let's finish the job and block @AppStore access in Russia. They kill our children, now kill their access! — Mykhailo Fedorov (@FedorovMykhailo) March 1, 2022
No more @Apple product sales in Russia!
Now @tim_cook let's finish the job and block @AppStore access in Russia. They kill our children, now kill their access!
— Mykhailo Fedorov (@FedorovMykhailo) March 1, 2022
गेल्या आठवड्यात युक्रेनचे उपपंतप्रधान मायखाइलो फेडोरोव्ह () यांनी अॅपलला एक पत्र लिहिले होते, ज्यात त्यांनी रशियाला कंपनीची उत्पादने, सेवा आणि अॅप स्टोअरमधून काढून टाकण्याची मागणी केली होती. ते म्हणाले की, अशा हालचालींचा तरुणांवर परिणाम होईल आणि रशियाचे लोक त्यांच्या सैन्याच्या हेतूला नक्कीच विरोध करतील. अॅपलच्या निर्णयानंतर मायखाइलो फेडोरोव्ह यांनी ट्विट करून रशियामध्ये अॅपलच्या उत्पादनांची विक्री थांबवण्याची माहिती दिली आहे. अॅप स्टोअरवर प्रवेश बंद करण्याची मागणीही त्यांनी केली असल्याचे सांगितले जात होते.
अॅपलने आपल्या निवेदनात अॅप स्टोअरबद्दल जास्त माहिती दिलेली नाहीये. तसेच, कंपनीने युक्रेनमधील Apple Maps चे रहदारी आणि थेट घटना वैशिष्ट्य अक्षम केले आहे. अॅपलच्या आधी गुगलनेही असे पाऊल उचलले आहे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. Google ने युक्रेनमधील Google Maps ट्रैफिक डेटा देखील बंद करुन टाकला आहे.
अॅपलने म्हटले आहे की, ‘रशियाने युक्रेनवर () केलेल्या हल्ल्यामुळे आम्ही चिंतित आहोत आणि या हिंसाचाराचा सामना करणाऱ्या सर्वांच्या पाठीशी देखील उभे आहोत. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही अनेक पावले उचलली आहेत, जसेकी गेल्या आठवड्यात आम्ही रशियातील सर्व सेल चॅनेलची निर्यात थांबवली. Apple Pay आणि इतर सेवा देखील मर्यादित असणार आहेत.
RT News आणि Sputnik News यापुढे रशियाच्या बाहेर अॅप स्टोअरवर उपलब्ध नसतील. आम्ही युक्रेनमध्ये Apple Maps ची रहदारी आणि थेट घटना वैशिष्ट्ये अक्षम केलीत. कंपनीने सांगितले आहे की आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि संबंधित सरकारांशी बोलत देखील आहोत. आम्ही जगभरातील सर्व लोकांसोबत उभे आहोत ज्यांना शांतता हवी आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App