वैमानिकरहित विमानांचे जग

अफगणिस्तानमध्ये दुर्गम भागात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी अमेरिकेने ड्रोन विमानांचा वापर सुरु केला आणि त्याची चर्चा जगभर सुरु झाली. आता अधिक विधायक कामांसाठी तसेच खासगी कांमासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याचा जगभर प्रयत्न सुरु आहे. The world of drones

स्विस सरकराने नुकतीच ड्रोन टपाल सेवा सुरु केली. त्यानुसार ड्रोन विमानंच्या मदतीने तेथे आता टपाल किंवा पार्सल पाठवले जाते. काही शहरात प्रातिनिधीक स्वरुपात ही सेवा सध्या सुरु करण्यात आलेली आहे. अमेझान या जागतिक कंपनीनेही आता पार्सल पाठवण्यासाठी ड्रोन विकसित केले आहे. तसेच अवयव वाहतूकीसाठी ड्रोनचा वापर करण्याचे नियोजन जगभर सुरु आहे.

कारण एकाद्या व्यक्तीचा अवयव दुसऱ्या अन्य व्यक्तीला बसवायचा असेल तर अतिशय कमी वेळेत तो न्यावा लागतो. अशा वेळी रस्त्यावरील वाहतूकीच्या वर्दळीचा फार मोठा सामना करावा लागतो. त्यात फार वेळ जातो. त्यापेक्षा हलक्या ड्रोन विमानांच्या मदतीने ही वाहूतक अधिक जलद करणे शक्य होणार आहे. सध्या ड्रोन विमाने ही खूप हलकी असलेयने जास्त वजन वाहून नेण्याची त्यांची क्षमता नाही. मात्र हाच त्यांचा यूएसपीदेखील आहे. मौल्यवान कमी वजनाच्या वस्तूंच्या वाहतुकीसाठी त्यांचा वापर आगामी काळात मोठ्या प्रमाणात होईल यात शंका नाही.

भविष्यात वैमानिकरहित विमानाचे जग असेल. त्यासाठीच्या तंत्रज्ञानासाठी मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध आहे. २०२० पर्यंत जगभरात अशा मानवरहित ड्रोन विमानांची ५० अब्ज डॉलर्सची बाजारपेठ निर्माण होऊ शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमेरिकेतही विमान वाहतूक मंत्रालयाकडे येत्या काही काळात वैमानिकरहित विमाने आणि त्यांना नियंत्रण करणारे नियंत्रण कक्ष उभारले जाऊ शकतील का याची विचारणा अमेरिकन संसदेने नुकतीच केली आहे. त्यावरुन याचे महत्व लक्षात येते.

सध्या ड्रोन विमाने लष्कराबरोबर अवकाश छायाचित्रणासाठी वापरली जातात. मात्र आता त्याचा वापर वाढू लागलेला आहे. हे मात्र नक्की. भविष्यात ड्रोन विमानांचा उपयोग रस्ते वाहतूक नियंत्रण, सीमासुरक्षा आणि टेहळणीसाठी केली जाऊ शकेल. त्याचबरोबर जंगलातील वणवे किंवा अणुऊर्जा प्रकल्पातील दुर्घटनांनंतर माहिती मिळवण्यासाठी याचा वापर करता येऊ शकतो. त्याचबरोबर हंगामी स्वरूपाची वाय-फाय किंवा मोबाइल सेवाही पुरवण्याची क्षमता ड्रोन विमाने करू शकतील का याचीही चाचपणी सुरू आहे.

The world of drones

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub