वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेप्रमाणे भयानक असणार नाही, असे इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चनर (आयसीएमआर) स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून तिसऱ्या लाटेच्या धोक्याबाबत चर्चा होती. त्यामुळे आयसीएमआरच्या स्पष्टीकरणामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे. The third wave of corona will not be terrible; A heartwarming report from ICMR
देशात कोरोनाची दुसरी लाट कमी झालेली नाही. मात्र तीव्रता कमी झाली आहे. रुग्णसंख्या अमी मृत्यूचे प्रमाण जूनच्या अखेर घेटले आहे. परंतु कोरोनाच्या डेल्टा प्लस या प्रकारामुळे जनतेत धास्ती आहे. आतापर्यंत दोन मृत्यू झाले आहेत. यातील एक मृत्यू महाराष्ट्रातील आहे. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत ‘आयसीएमआर’ने एक अहवाल प्रसिद्ध झाला असून यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
‘इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)’ने कोरोनाची तिसरी लाट आल्यास ती दुसऱ्या लाटेसारखी भयानक नसेल असा अहवाल प्रसिद्ध केला आहे. लसीकरणामध्ये आणखी तेजी आणल्यास तिसऱ्या लाटेवर अंकुश लावता येऊ शकतो, असे अहवालामध्ये म्हटले आहे. ‘आयसीएमआर’चे डॉ. संदीप मंडल, डायरेक्टर जनरल बलराम भार्गव, चिफ एपिडेमोलॉजिस्ट डॉ. समीरन पांडा आणि निमालन अरिनमिनपथी यांनी एका गणितीय मॉडेलच्या आधारावर हा अहवाल सादर केला आहे.
कोविडमुक्तांना पुन्हा धोका
अहवालानुसार, कोरोनामुक्त झाले आहेत त्यांच्यातील रोग प्रतिकारक क्षमता वेळेनुसार कमी होऊ शकते. त्यामुळे ज्यांना आधी कोरोनाची लागण झाली होती तेच लोक पुन्हा संक्रमित होऊ शकतात.
मृतांचा आणि संक्रमितांचा आकडा वाढला
दरम्यान, दुसऱ्या लाटेत गर्भवती मोठ्या प्रमाणात संक्रमित झाल्या होत्या. तसेच दुसऱ्या लाटेत मृतांचा आणि संक्रमितांचा आकडाही आधीच्या लाटेपेक्षा वाढला होता, असेही आयसीएमआरच्या एका अभ्यासात स्पष्ट झाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App