अनेक जण शाकाहार न करण्यामागे ताकद कमी मिळते असे कारण देतात. त्यामुळे आम्ही मांसाहार करतो असा त्यांचा दावा असतो. साऱ्या पृथ्वीतलावरील सध्या अस्तित्वात असलेला सगळ्यात शक्तीशाली व वजनदार प्राणी म्हणून हत्तीकडे पाहिले जाते. नुकत्याच जन्मलेल्या हत्तीच्या पिल्लाचे वजनही तीनशे ते चारशे किलो असते. यावरुन मोठ्या हत्तीच्या वजनाची कल्पना केलेली बरी. पण हा अवाढव्य प्राणी शाकाहारी आहे. गवत व फळे खावून व पोटभर पाणी पिवून तो ही ताकद कमावतो. त्यामुळे शाकाहारामुळे ताकद मिळत नाही असा दावा करणाऱ्यांना यातून उत्तर मिळले. खरे तर जंगलात आजूबाजूला अनेक हिंस्त्र प्राण्यांच्या सान्निध्यात रहात असतो. तरीही हत्ती कधीही ताकदीसाठी मांस भक्षण करित नाही. शेतात दिवसभर शेतकऱ्यां सोबत राबराब राबणारा बैल कधी मांसाहार करतो का. त्याचेही उत्तर नाही असेच आहे. The secret of science: the world’s most powerful animal, the elephant, as well as the ox in the field, are also vegetarians.
चारा खावून बैल तुफान ताकद कमावतो व त्याचा वापर करतो. अश्वशक्तीने कुठल्याही यंत्राची शक्ती मोजली जाते अश्व-घोडा कधी मांसाहार करतो का. त्यामुळे मग मांसाहार केल्यानेच शक्ती मिळते असे कसे म्हणता येईल. त्याला काही अर्थ नसतो. आपण योग्य त्या प्रमाणात व सर्वप्रकारे योग्य तो शाकाहार करत नाही. डाळी, कडधान्ये, दूध, तूप, ताजी फळे. ताज्या हिरव्यागारा पालेभाज्या पुरेशा प्रमाणात खात नाही. त्यामुळे साहजिकच आपल्याला पुरेशा प्रमाणात ताकद मिळत नाही. आणि त्याचे खापर आपण उगाचच शाकाहारावर फोडतो. दोश शाकाहाराच नाही तर आपला असतो. आपल्याला असलेल्या चुकीच्या सवयींचे खापर आपण शाकाहारावर फोडतो किंवा मांसाहाराचे समर्थन करण्यासाठी असा चुकीचा युक्तीवाद करीत राहतो. त्यापेक्षा दिवसभरात योग्य त्या प्रमाणात आपल्या शरीराचा रचना व आपल्या करावी लागणारी कामे यांचा ताळमेळ घालून जर शाकाहार केला तर कोणतीच समस्या राहणार नाही. मांसाहार करणाऱ्या इतकी किंवा कदाचित त्यांच्यापेक्षा जास्त ताकद मिळेल हे वेगळे सांगायला नको.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App