विशेष प्रतिनिधी
लातूर : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा निधी वाटप करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील निवडक शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी लातूर जिल्ह्यातील मातोळा (ता. औसा) येथील शेतकऱ्याला पंतप्रधानांनी राम राम म्हणून संबोधन केले. The Prime Minister called the farmers of Latur Ram-Ram
मातोळा येथक्षल शेतकरी गणेश राजेंद्र भोसले यांच्याशी पंतप्रधानांनी आॅनलाईन संवाद साधला. पंतप्रधानांनी नमस्ते गणेशजी असे म्हणून बोलायला सुरूवात केली. यावर भोसले राम-राम असे म्हणाले. पंतप्रधानांनीही त्यांना राम-राम असे म्हणून उत्तर दिले. यावेळी भोसले यांनी पंतप्रधान पीक विम्याचा लाभ झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अडीच हजार रुपये विमा भरला होता, नुकसानभरपाई म्हणून ५४हजार ३१५ रुपये मिळाले असे भोसले यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी भोसले यांना विचारले की शेतीशिवाय काय करता? यावर त्यांनी माझ्याकडे ९ गायी आणि १३ म्हशी असल्याचे सांगितले. आपल्याकडे ३ हेक्टर जमीन आहे. त्यावर सोयाबीन आणि तूर पिक घेतले आहे. कमाई शेतीमध्ये होते की पशुपालनात यावर भोसले म्हणाले की पशुपालन हे शेतीला पूरक आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App