ओरायन नेब्युला म्हणजे ताऱ्यांची जणू खाणच


ओरायन तारकासमूह किंवा ज्याला मृग नक्षत्र म्हटलं जाते. ओरायन तारकासमूह हा फक्त त्याच्या ताऱ्यासाठी प्रसिद्ध नाही तर अजून एका वेगळ्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. ती गोष्ट म्हणजे ओरायन नेब्युला. ओरायन नेब्युला हा उघड्या डोळ्यांनी बघता येणारा पूर्ण विश्वातील एकमेव नेब्युला आहे. अगदी सहजपणे आपण त्याला ओरायन तारकासमुहात उघड्या डोळ्यांनी बघू शकतो. पण त्याचं सौंदर्य बघायचं असेल तर त्याला टेलिस्कोप शिवाय पर्याय नाही. हा नेब्युला पृथ्वीपासून सुमारे १३४२ प्रकाशवर्ष लांब आहे. एक प्रकाशवर्ष म्हणजे एका वर्षात प्रकाशाने तीन लाख किलोमीटर दर सेकंद ह्या वेगाने कापलेले अंतर. ओरायन नेब्युलाचं वस्तुमान सूर्याच्या २००० पट आहे. The Orion Nebula is like a mine of stars

हा नेब्युला म्हणजे ताऱ्यांना जन्म देणारी एक मोठी वसाहत आहे. इकडे आजही हजारो तारे जन्माला येत आहेत. नेब्युला म्हणजे अवकाशातील धूळ, वायू ह्यांचा एक मोठा ढग. तर ह्या ढगातील धूळ, वायू खूप दूरवर पसरलेले असतात. हळूहळू ह्यातील गुरुत्वाकर्षण ह्या सगळ्यांना जवळ जवळ आणत रहाते. ह्या वायू मध्ये मुख्यतः हायड्रोजन आणि हेलियम हे वायू असतात. जवळजवळ येऊन ह्या ढगाची व्याप्ती वाढत जाते. एक वेळ अशी येते की हा ढग आपल्याच गुरुत्वाकर्षणावर तग धरू शकत नाही. त्याच्या रेट्यापुढे तो आतल्या आत कोलमडून जातो. असं कोलमडून गेल्यामुळे ह्या ढगाच्या आत असलेलं साहित्य प्रचंड गरम होते. हा आतला तापलेला भाग म्हणजेच एका ताऱ्याची निर्मिती सुरु होते. ओरायन नेब्युला अश्या ढगांची खाण आहे. ह्या खाणीतून आत्ताच्या क्षणाला सुद्धा अनेक ताऱ्यांची निर्मिती सुरु आहे.

ह्या सर्व ताऱ्यांचं वस्तुमान सूर्याच्या जवळपास १५-३० पट असून १.५ प्रकाशवर्ष अंतरावर हे सर्व तारे एकमेकांपासून लांब आहेत. ओरायन नेब्युलाच्या ह्या खाणीत विश्वाच्या उत्पत्ती ची अनेक रहस्य लपलेली आहेत. आपला सूर्य, आपली सौरमाला ते ह्या विश्वात ताऱ्यांची उत्पत्ती ह्या सगळ्या बद्दल जाणून घ्यायची संधी ह्या ओरायन नेब्युलाने पूर्ण मानवजातीला उपलब्ध करून दिली आहे.

The Orion Nebula is like a mine of stars

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात