स्वामी नित्यानंद या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरूची देशभरात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. बलात्काराचा आरोपी आणि फरार झालेला नित्यानंद सर्वांनाच माहिती आहे. 2019 मध्ये तो भारतातून पळून गेला होता. तो स्वतः देव असल्याचा दावा करतो. त्याने इक्वेडोरजवळ एक बेट विकत घेऊन त्याला ‘कैलासा’ देश बनवल्याचा दावाही केला होता. आता त्याच तथाकथित ‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलास’चा प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अवतरल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.The Focus Explainer Rape Accused, Fugitive Nithyananda’s Country ‘Kailasa’ How in United Nations? Read in detail
वास्तविक, याच फरार झालेल्या नित्यानंदने एक ट्विट केले आहे. त्याने केलेल्या ट्विटनुसार, त्याच्या युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासाचा एक सदस्य संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत सहभागी झाला. ही बैठक जीनिव्हा येथे झाली होती.
त्याने ट्विट केले की, ‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा UN जिनिव्हा मध्ये. युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासाने जीनिव्हा येथे UNच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क आणि शाश्वत विकास या विषयावरील चर्चेत भाग घेतला.
😕 pic.twitter.com/DvbCATEMvx — Swaraj Srivastava (@SwarajAjad) February 28, 2023
😕 pic.twitter.com/DvbCATEMvx
— Swaraj Srivastava (@SwarajAjad) February 28, 2023
संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत सहभागी झालेल्या कैलासाच्या प्रतिनिधीचे नाव विजयप्रिया नित्यानंद आहे. या महिला प्रतिनिधीने स्वत:चे वर्णन संयुक्त राष्ट्रात कैलासाची ‘कायम राजदूत’ म्हणून केले आहे. यूएनच्या या बैठकीत विजयप्रिया यांनी भारतावर नित्यानंदचा छळ केल्याचा आरोपदेखील केला आहे.
विजयप्रिया यांनी नित्यानंद यांना हिंदू धर्माचे ‘सर्वोच्च गुरू’ असे वर्णन केले. त्यांचा छळ होत असल्याचा आरोप केला. विजयप्रिया यांनी संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर सांगितले की, नित्यानंद यांना प्रचार करण्याची आणि त्यांच्या देशात परतण्याची परवानगी दिली जात नाही. त्या म्हणाल्या की, नित्यानंद आणि कैलासातील 20 लाख हिंदू स्थलांतरित लोकसंख्येचा छळ थांबवण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उपाययोजना केल्या पाहिजेत.
पण कैलासाचा संयुक्त राष्ट्रात प्रतिनिधी कसा?
युनायटेड नेशन्सच्या बैठकीत विजयप्रिया नित्यानंद यांच्या सहभागावरून कैलासाच्या वतीने चर्चा सुरू आहे. काल्पनिक देशाचा प्रतिनिधी संयुक्त राष्ट्रांच्या कोणत्याही बैठकीत कसा सहभागी होऊ शकतो, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
वास्तविक, संयुक्त राष्ट्रांच्या या बैठकीत मानवाधिकारांच्या उल्लंघनावर चर्चा होत होती. यामध्ये कोणतीही व्यक्ती किंवा गट किंवा संस्था जाऊन आपले म्हणणे मांडू शकते.
युनायटेड नेशन्सच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार करारांतर्गत मिळालेल्या अधिकारांचे उल्लंघन किंवा छळ होत आहे, अशी कोणतीही व्यक्ती किंवा संस्थेला वाटत असेल, तर ते तेथे जाऊन आपले म्हणणे मांडू शकतात.
वेबसाईटवर सांगितले आहे की, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार करारांतर्गत तक्रारी करता येतील. संयुक्त राष्ट्रांनी 9 मानवाधिकार करार तयार केले आहेत, ज्या अंतर्गत प्राप्त अधिकारांच्या उल्लंघनाशी संबंधित दावे केले जाऊ शकतात.
1. नागरी आणि राजकीय हक्क. 2. अत्याचार, क्रूर, अमानुष किंवा अपमानास्पद वागणूक. 3. वांशिक भेदभाव. 4. लिंगभेद. 5. अपंगांना दिलेल्या अधिकारांचे उल्लंघन. 6. हरवलेल्या व्यक्तींचे संरक्षण. 7. स्थलांतरित मजूर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हक्कांचे उल्लंघन. 8. आर्थिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक अधिकारांचे उल्लंघन. 9. मुलांचे हक्क.
USK at UN Geneva: Inputs on the Achievement of Sustainability Participation of the United States of KAILASA in a discussion on the General Comment on Economic, Social and Cultural Rights and Sustainable Development at the United Nations in Geneva The Economic, Social, and… pic.twitter.com/pNoAkWOas8 — KAILASA's SPH NITHYANANDA (@SriNithyananda) February 25, 2023
USK at UN Geneva: Inputs on the Achievement of Sustainability
Participation of the United States of KAILASA in a discussion on the General Comment on Economic, Social and Cultural Rights and Sustainable Development at the United Nations in Geneva
The Economic, Social, and… pic.twitter.com/pNoAkWOas8
— KAILASA's SPH NITHYANANDA (@SriNithyananda) February 25, 2023
कोण आहे नित्यानंद?
नित्यानंदचा जन्म 1 जानेवारी 1978 रोजी तामिळनाडूमध्ये झाला. त्याच्या वडिलांचे नाव अरुणाचलम आणि आईचे नाव लोकनायकी आहे. नित्यानंदने 1992 मध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. 1995 मध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंग पूर्ण केली असे म्हटले जाते. याशिवाय असा दावाही केला जातो की, वयाच्या 12व्या वर्षापासून त्याने रामकृष्ण मठात शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती.
1 जानेवारी 2003 रोजी नित्यानंद यांनी बंगळुरूजवळील बिदादी येथे पहिला आश्रम उघडला होता. त्यानंतर त्याने अनेक आश्रम उघडले.
2010 मध्ये नित्यानंदवर फसवणूक आणि अश्लीलतेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याची एक सेक्स सीडी समोर आली होती. या प्रकरणात नित्यानंदला अटकही झाली होती, मात्र काही दिवसांतच त्याला जामीन मिळाला.
2012 मध्ये नित्यानंदवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नोव्हेंबर 2019 मध्ये पुन्हा त्याच्यावर दोन मुलींचे अपहरण करून त्यांना बंदिस्त ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा?
अटकेच्या भीतीने नित्यानंद भारतातून पळून गेला. त्याला फरार घोषित करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोरमध्ये जमीन खरेदी केली आणि त्यालाच आपला देश म्हणून घोषित केले.
नित्यानंदाने या देशाला ‘कैलास’ असे नाव दिले आणि ‘हिंदू राष्ट्र’ म्हटले. कैलासाच्या वेबसाइटनुसार, कैलास चळवळ अमेरिकेत सुरू झाली होती. जगभरात छळलेल्या हिंदूंना येथे संरक्षण दिले जाते असा दावा करण्यात आला आहे. येथे सर्व हिंदू जात, लिंग असा कोणताही भेदभाव न करता शांततेने राहतात.
विजयप्रिया नित्यानंद यांनी संयुक्त राष्ट्रात दावा केला होता की, येथे 20 लाख स्थलांतरित हिंदू राहतात. कैलासाने 150 देशांमध्ये दूतावास आणि स्वयंसेवी संस्था स्थापन केल्याचा दावाही त्यांनी केला.
वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, तथाकथित कैलासा देशात इंग्रजी, संस्कृत आणि तामिळ भाषा बोलल्या जातात. त्या देशाचा राष्ट्रीय प्राणी ‘नंदी’ आहे. त्याच वेळी, राष्ट्रध्वज ‘ऋषभ ध्वज’ आहे. कैलासाच्या ध्वजावरही नित्यानंदांचे चित्र आहे. देशाचे राष्ट्रीय फूल ‘कमळ’ आणि राष्ट्रीय वृक्ष ‘वट’ आहे.
एवढेच नाही तर कैलासाचे स्वतःचे संविधान असल्याचा दावाही करण्यात आला आहे. कैलासात रिझर्व्ह बँक आणि चलनही त्यांनी आणले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App