DRDO Anti-COVID drug 2DG : डीआरडीओचे कोविड प्रतिबंधक औषध सध्या एम्स, लष्करी रूग्णालयांमध्ये उपलब्ध, जूननंतर सर्वत्र मिळणार


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – डीआरडीओच्या Anti-COVID drug 2DG या औषधाच्या पहिल्या दोन खेपा मर्यादित स्वरूपात वापरण्यात येतील. सुरूवातीला एम्स, लष्करी रूग्णालये आणि डीआरडीओची हॉस्पिटल्स यांच्यात त्यांचा वापर होईल. काही ठिकाणी गरजूंना त्या उपलब्ध करून देण्यात येतील. जून महिन्यानंतर सर्व हॉस्पिटलमध्ये हे औषध उपलब्ध होईल. तोपर्यंत त्याचे उत्पादन वाढवून स्थिर होईल, अशी माहिती डीआरडीओचे चेअरमन डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी दिली आहे. The first & second batch of anti-COVID drug 2-DG will be used in a limited manner. It will be used in AIIMS, Armed Forces Hospitals, DRDO hospitals

डीआरडीओच्या संशोधक आणि शास्त्रज्ञांनी देशांतर्गत संशोधन करून कमी कालावधीत विकसित केलेले Anti-COVID drug 2DG हे देशातले पहिले औषध आहे. याचा उपयोग कोरोनाची लाट रोखण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केला आहे.

डीआरडीओने विकसित केलेल्या Anti-COVID drug 2DG या कोविड प्रतिबंधक औषधामुळे पेशंटची रिकव्हरी लवकर होईल आणि ऑक्सिजनवरचे अवलंबित्व कमी होईल, असेही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.

या औषधाची पहिली खेप संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे सुपूर्द केली. त्यांनी ती दिल्लीतील एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्याकडे सुपूर्द केली. कोरोनाविरोधातील लढाईत शिथिलता आणणार नाही. यासंबंधीचे वैद्यकीय संशोधन डीआरडीओमधील संशोधक सुरूच ठेवतील, अशी ग्वाही राजनाथ सिंग यांनी दिली.

The first & second batch of anti-COVID drug 2-DG will be used in a limited manner. It will be used in AIIMS, Armed Forces Hospitals, DRDO hospitals

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात