महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांच्या निकालाचा नेमका अन्वयार्थ सांगायचा असेल, तर ठाकरे ब्रँडचा दबदबा संपला आणि पवार ब्रँडची राजकीय प्रतिष्ठा धुळीला मिळाली, असेच म्हणावे लागेल.The dominance of the Thackeray brand is over; the political prestige of the Pawar brand has been destroyed
महाराष्ट्रात भाजपा आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांना पवार आणि ठाकरे हे दोनच प्रादेशिक ब्रँड आत्तापर्यंत आव्हान देत होते. किंबहुना ते राष्ट्रीय पक्षांना आव्हान देणारे प्रादेशिक नेते म्हणून त्यांचे ब्रँड त्यांच्या समर्थकांनी आणि मराठी माध्यमांनी विकसित केले होते. पण महाराष्ट्रातल्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे आणि पवार या दोन्ही ब्रँड्सनी आपापली राजकीय ताकद स्वतःहून संकुचित करून घेतली संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करून सर्वत्र संचार करण्याऐवजी त्यांनी स्वतःला मुंबई आणि पुणे पिंपरी चिंचवड पुरते मर्यादित करून घेतले होते. परंतु या तिन्ही शहरांमध्ये या दोन्ही ब्रँड्सना मतदारांनी कुठलीच किंमत ठेवली नाही. मुंबईतल्या मतदारांनी ठाकरे ब्रँडचा दबदबा संपुष्टात आणला तर पुणे आणि पिंपरी चिंचवड मधल्या मतदारांनी पवार नावाच्या ब्रँडची राजकीय प्रतिष्ठा धुळीला मिळवली.
ठाकरे आणि पवार असे दोन्ही ब्रँड जरी प्रादेशिक नेतृत्वाचे ब्रँड मानले गेले असले तरी प्रत्यक्षात त्या दोन्ही ब्रँडचे वैशिष्ट्य वेगवेगळे होते. ठाकरे ब्रँड तुलनेने प्रामाणिक आणि संघर्षशील होता तर पवार ब्रँड नेहमीच खरी खोटी डबल ढोलकी वाजवत सत्तेच्या वळचणीला राहिला होता. ठाकरे ब्रँडने संघर्ष करून मुंबईतली सत्ता टिकवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी स्वतःच्या अस्तित्वाची लढाई त्यांनी मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई करून पाहिली, पण मराठी माणसाने वेगळा निर्णय घेतला. मुंबईतल्या मराठी माणसाने स्वतःला ठाकरे ब्रँडशी संलग्न करून ठेवले नाही. मुंबईतला मराठी माणूस त्या ब्रँडच्या पलीकडे गेला. मुंबईतल्या मराठी माणसाने हिंदुत्व आणि मराठी प्रादेशिकता यांची सांगड घालून भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षाच्या पारड्यात यश टाकले. मुंबईतल्या मराठी आणि हिंदू माणसाने ठाकरे नावाच्या ब्रँडचा दबदबा संपविला, पण त्याची थोडीफार प्रतिष्ठा राखली.
त्या उलट पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या मतदारांनी पवार नावाच्या राजकीय प्रतिष्ठा पुरती धुळीला मिळवली. पवारांची राष्ट्रीय नेत्यापासून ते संपूर्ण महाराष्ट्राचे नेते, पश्चिम महाराष्ट्राचे नेते, दक्षिण महाराष्ट्राचे नेते, पुणे विभागाचे नेते, त्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या परिक्षेत्रातले नेते, अशी पायऱ्या पायऱ्यांनी प्रतिमा घसरत गेली. ती प्रतिमा पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या मतदारांनी आणखी ढासळून टाकली. पवार ब्रँड त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधून घालवून टाकला तो फक्त बारामती पुरता शिल्लक ठेवला.
पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये अनेक पवार समर्थक नेत्यांनी भाजपचे कमळ हातात घेतले. त्यानंतरच ते महापालिकेवर निवडून येऊ शकले. यातल्या बहुसंख्य नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पवारांनीच भाजपमध्ये पाठविले होते असे बोलले गेले सुप्रिया सुळे यांनी तशाच पद्धतीचे वक्तव्य केले होते भाजपमध्ये मूळचे भाजपवाले किती आणि बाहेरून आले किती ते मोजा, असे हिणवले होते. पण पवारांच्या पक्षात राहून, पवारांचे तुतारी वाला चिन्ह घेऊन आणि पवारांचे नाव लावून निवडून येता येत नाही, म्हणून तर पवार समर्थक नेते भाजपमध्ये गेले. पवारांना आपले नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये पाठवावे लागले किंवा त्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्वतःहून भाजपची वाट धरली. हे सुप्रिया सुळे यांनी सांगितले नाही, पण म्हणून राजकीय वास्तव लपून राहिले नाही.
– कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे अपयशी
महापालिका निवडणुका कार्यकर्त्यांच्या होत्या. आमच्या मोठ्या निवडणुकांमध्ये कार्यकर्ते राबतात. स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांचे ऐकायचे असते. त्यांनी सांगितल्यामुळेच दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले होते. परंतु कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे राबल्या नाहीत. त्यांनी कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत घरोघरी जाऊन प्रचार केला नाही. अजित पवार पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या गल्लीबोळात फिरले, पण सुप्रिया सुळे त्यांच्याबरोबर फिरल्या नाहीत. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये मतदारांनी पवार ब्रँडला धुळीला मिळवले यात अजित पवारांच्या बरोबरीने सुप्रिया सुळेंचेही अपश्रेय आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App