पालक आणि मुलांचे नाते हे जन्मभर टिकणारे, वाढणारे असे नाते असते. नात्याची ही अतूट वीण तुम्हाला जीवनभर साथ देते. जन्मभर पुरणारी आणि पुढच्या सर्व नात्यांचा रंग आणि पोत ठरणारी ही शिदोरी पालक-मुलं या नात्यामध्ये जन्मते. कोणत्याही स्व-निर्मित कारणाशिवाय कोणीतरी माझ्यावर प्रेम करत आहे. The behavior of parents has a profound effect on the minds of adolescents
माझ्यासाठी कष्ट घेत आहे, म्हणजे मी सुद्धा लायक व्यक्ती आहे, हा पाया भक्कम असणे गरजेचे आहे. आई-मुलं या नात्याने त्याची सुरूवात होत असली तरीही बाबा त्यात लवकरच सहभागी होतात आणि महत्वाचा घटक बनतात.
किशोरवयीन मुलांच्या मनावर पालक आपल्याशी कसे वागतात याचा फार मोठा परिणाम होत असतो. मुलांच्या वाढीसाठी हा फार महत्वाचा काळ असतो. या काळात जर मुलांना मारझोड केली किंवा त्यांची सतत हेटाळणी केली तर मुलांच्या मनावर विपरित परिणाम होतात.
पण याच वयात जर मुलांना त्यांच्या चांगल्या कामासाठी शाबासकी दिली, त्यांचे वेळोवेळी कौतुक केले तर त्यांना नक्कीच हुरूप येईल. प्रत्येक नात्यामध्ये काही मध्यवर्ती भावना असतात. या नात्याचा पूर्ण प्रवास हा भावनांवर आधारित असतो. पालकत्वाची मध्यवर्ती भावना ही जबाबदारी आहे आणि ती सुसह्य व्हावी म्हणून म्हणून निसर्गाने आपुलकी प्रेम, कौतुक इत्यादी सहयोगी भावनाही निर्माण केल्या.
मुलं असण्याची मध्यवर्ती भावना ही विश्वास आहे आणि आदर, प्रेम, हक्क या सहयोग भावना त्या विश्वासाला जिवंत रहायला मदत करतात. या पार्श्वभूमीवर आपल्याला आता भविष्याकडे बघायला हरकत नाही. सध्या दिसणारे आणि भविष्यात वाढत जाणारे बदल म्हणजे पालक आणि मुलांचा एकमेकांच्या सहवासात जाणारा वेळ कमी होतो आहे.
मुलांच्या आयुष्यात अधिकाधिक लवकर इतर व्यक्ती प्रवेश करत आहेत आणि मुलांच्या आयुष्यावर अधिकार गाजवत आहेत. त्यांना तसा अधिकार देणे नक्कीच योग्य नाही. यासाठी पालकांनी आपल्या महत्वाकांक्षाना वेळीच लगाम घालून आपल्या घरासाठी, मुलांसाठी पर्याप्त वेळ काढणे हिताचे असते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App