ठाकरे सरकारची तीसरी विकेट ? उद्धव ठाकरेंच्या चाणक्यांपर्यंत पोहचला तपास ; अनिल परब यांच्यावर कोट्यावधी रुपयांच्या वसुलीचा आरोप

अनिल परबांच्या अडचणीत वाढ, भ्रष्टाचारांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना


परिवहन विभागात बदल्यांसाठी कोट्यवधीची लाच स्विकारली जात असल्याचा  आरोप.


राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे आज नाशिकमध्ये चौकशीसाठी .


पोलीस उपायुक्त संजय बारकुंड हे या प्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.Thackeray government’s third wicket? Investigation reaches Uddhav Thackeray’s closest minister; Anil Parab accused of recovering crores of rupees


विशेष प्रतिनिधी

नाशिक : महाविकास आघाडी सरकारसमोरची संकट दिवसेंदिवस वाढत आहेत .वनमंत्री संजय राठोड , गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर दोघांनी राजीनामा दिला . आता परिवहन मंत्री अनिल परब यांची विकेट पडली तर महाविकास आघाडी सरकारसाठी हा मोठा धक्का असेल. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर नाशिक पोलीस आयुक्तांनी या आरोपांची चौकशी करण्यासाठी एका चौकशी समितीची स्थापना केली आहे. अनिल परब, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे आणि इतर काही कर्मचारी परिवहन विभागात होणाऱ्या भ्रष्टाचारात सहभागी असल्याची तक्रार गजेंद्र पाटील या निलंबीत अधिकाऱ्याने केली आहे.Thackeray government’s third wicket? Investigation reaches Uddhav Thackeray’s closest minister; Anil Parab accused of recovering crores of rupees

नाशिक विभागासह राज्यभरात प्रादेशिक परिवहन विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप याच विभागातील एका मोटार वाहन निरीक्षकाने केला . त्यावरुन पंचवटी पोलिसांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरुद्ध तक्रारीच्या आधारावर चौकशी सुरू केली आहे.

आरटीओ विभागातील (प्रादेशिक परिवहन) निलंबित अधिकारी गजेंद्र पाटील यांनी परिवहन मंत्री परब यांच्यासह ६ बड्या अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणारी तक्रार पंचवटी पोलिसांत केली होती. गजेंद्र पाटील हे नाशिकला मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत होते. गजेंद्र पाटील यांच्या तक्रारीचे गंभीर स्वरूप पाहूनच ही चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Motar Vehicale Inspector म्हणून काम करणारे गजेंद्र पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर जानेवारी महिन्यापासून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गजेंद्र पाटील यांनी आपल्या तक्रारीत परिवहन मंत्री अनिल परब, आयुक्त ढाकणे यांच्यावर लाच घेतल्याचा आणि भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. परिवहन विभागात बदल्यांसाठी लाच घेणाऱ्या Deputy RTO चं नावही पाटील यांनी आपल्या तक्रारीमध्ये नमूद केलं आहे. हा अधिकारीच या सर्व रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.

आरोप काय?

गजेंद्र पाटील यांनी परिवहन विभागात बदल्यांचं रकेट कसं चालतं याचा पर्दाफाश आपल्या तक्रारीत केला आहे. उपपरिवहन अधिकारी बजरंग खरमाटे हे बदल्या मॅनेज करत असून अर्थपूर्ण व्यवहार करत आहेत. त्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांचं अभय आहे, असा दावा पाटील यांनी तक्रारीत केल्याची माहिती आहे.

गजेंद्र पाटील यांनी परिवहन विभागातील गैरव्यवहार प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पाटील हे नाशिक परिवहन विभागात मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत होते. पाटील यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पंचवटी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या उपायुक्तांना दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने 31 मार्च 2020 नंतर BS4 कारच्या नोंदणीवर बंदी घातली आहे. असे असूनही, मागच्या तारखेला अधिकार्यांच्या संगनमताने अनेक लक्झरी कारची नोंद .

परिवहन विभागात बदली करण्यासाठी कोट्यवधी रुपये लाच म्हणून मागितले जातात. अविनाश ढाकणे यांची परिवहन आयुक्तपदावर नेमणुक करण्यासाठी तक्रार अर्जात नाव नमूद केलेल्या मुख्य सुत्रधाराने पाच कोटींची लाच परिवहन मंत्री अनिल परब यांना दिली होती. याव्यतिरीक्त पाटील यांनी आपल्या तक्रार अर्जात दोन जिल्ह्यांमधील RTO अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. चेकपोस्ट हे RTO अधिकाऱ्यांसाठी भ्रष्टाचाराचं महत्वाचं कुरण बनल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे.

या सर्व प्रकाराविरोधात आपण आवाज उठवला, वरिष्ठांच्या दबावाला बळी न पडल्यामुळे चुकीच्या आरोपांखाली आपल्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं पाटील यांनी सांगितलं.

परिवहन विभागात प्रत्येक पोस्ट आणि त्याच्या बदलीसाठी किती पैसे लाच म्हणून घेतले जातात याची माहिती पाटील यांनी पोलिसांना दिली आहे. १५ मे ला पाटील यांनी इ-मेल द्वारे नाशिकमधल्या पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपल्या तक्रारीत नाव आलेल्यांची चौकशी करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

पाटील यांची तक्रार दाखल झाल्यानंतर नाशिक पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. ज्यात तिन्ही अधिकारी DCP दर्जाचे आहेत. DCP Crime संजय बारकुंड हे या समितीचे प्रमुख असतील. या आरोपांची चौकशी करुन पाच दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

Thackeray government’s third wicket? Investigation reaches Uddhav Thackeray’s closest minister; Anil Parab accused of recovering crores of rupees

किरीट सोमय्या :

अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर लागणार आहे. परब केवळ दोन महिन्यांचेच पाहुणे आहेत. परब यांच्यावर वेगवेगळ्या घोटाळ्याचे आरोप आहेत. या सगळ्या घोटाळ्यांची विविध यंत्रणांमार्फत चौकशी सुरू असून राज्यपालांनीही परब यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे परब हे आता 2 महिन्यांचे पाहुणे असून सरकारनेच आता त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात